Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या ‘त्या’ कंपन्यांची अशीही ‘दादागिरी’ ; ‘या’ दिग्गज मोबाइल कंपनीला देताहेत टक्कर; अहवालाने केलाय खुलासा

नवी दिल्ली : मोबाइलच्या दुनियेत चिनी मोबाइल कंपन्यांचा दबदबा आहे, हे आता अवघ्या जगाला माहित झाले आहे. कोणताही देश घ्या तेथे चीनचे मोबाइल अगदी सहज दिसून येतात. इतकेच कशाला आता व्हीवो, ओप्पो, शाओमी या चिनी मोबाइल कंपन्यांनी इतका नावलौकीक मिळवला आहे, की सॅमसंगसारख्या अत्यंत दर्जेदार कंपनीसही टक्कर देत आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सॅमसंग सुद्धा मागे पडताना दिसत आहे.
जगभरातील लोकांनी आता 5 जी स्मार्टफोन खरेदी करण्यास सुरवात केली आहे. 5 जी नेटवर्क अद्याप सुरू झाले नसले तरी 5 ​​जी स्मार्टफोनची विक्री वाढत आहे. आजकाल सॅमसंगला 5 जी स्मार्टफोन विभागातील चिनी कंपन्या ‘ओप्पो’, ‘व्हिवो’ आणि ‘शाओमी’ कडून जोरदार टक्कर मिळत आहे.

Advertisement

मार्केट रिसर्च कंपनी ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट’ (एसए) च्या अहवाला नुसार या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सॅमसंगला या यादीत चौथा क्रमांक मिळाला आहे. सॅमसंगच्या तुलनेत या यादीत चिनी मोबाइल कंपन्या पुढे आहेत. सध्या या यादीमध्ये ‘अॅपल’ पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये ‘सॅमसंग’ इलेक्ट्रॉनिक्सचा बाजार हिस्सा १३ टक्के आहे, ‘अॅपल’ चा बाजार हिस्सा ३१ टक्के आहे, तर ‘ओप्पो’, ‘व्हिवो’ आणि ‘शाओमी’ यांचा बाजार हिस्सा ३९ टक्के आहे.

Advertisement

गेल्या वर्षीही ‘अॅपल’ ने २९.८ टक्के बाजारा हिश्श्यासह पहिला क्रमांक मिळवला होता. ‘ओप्पो’ १५.८ टक्के आणि ‘व्हिव्हो’ १४.३ टक्के सह तिसर्‍या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त, ‘शाओमी’ १२.२ टक्के सह पाचव्या स्थानावर होती. ‘सॅमसंगने’ १७ दशलक्ष ५ जी स्मार्टफोनची विक्री करुन चौथा क्रमांक मिळवला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, आज जगात चिनी टेक्नॉलॉजीचा बोलबाला आहे. कोणतेही टेक्निक असो त्याची कॉपी करण्यात चिनी मंडळी तरबेज आहेत. मोबाइलच्या दुनियेत तर चीन टॉपवर आहे. बाकीच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही चीनने खूप वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे जगभरात आज चिनी कंपन्यांचा दबदबा निर्माण झाला आहे, हे वास्तव आहे. जगातील अनेक देशांतील बाजारपेठा सुद्धा चीनने काबीज केल्या आहेत. दैनंदीन वापरातील कोणतीही वस्तू असो, मोबाइल असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असू द्या किंवा अन्य प्रकारचे तंत्रज्ञान असू द्या, सगळीकडेच चीन ठाण मांडून बसला आहे. एवढेच काय तर खुद्द अमेरिकेच्या बाजारपेठा सुद्धा चीन काबीज करू लागला आहे. अमेरिका आज अनेक वस्तूंसाठी चीनवरच अवलंबून आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply