Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… आता पाकिस्तानवर आलेय ‘ते’ ही संकट; ‘त्या’ कारणामुळे देशातील लोक झालेत आणखी गरीब

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तान आज अनेक संकटांनी घेरला गेला आहे. कोरोनाने अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. महागाईचा भडका उडाला आहे, अन्न धान्याची कमतरता आहे, बेरोजगारी वाढली आहे, या संकटात आता गरिबीची भर पडली आहे. जागतिक बँकेने व्यक्त केलेल्या एका अंदाजानुसार पाकिस्तानात मागील वर्षात देशातील गरिबीचा दर 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी 4.4 टक्के दर होता.

Advertisement

बॅंकेचा अंदाज आहे, की देशात 40 टक्के कुटुंबाना अन्न धान्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान सरकारच्या आकडेवारी नुसार 2015-16 आणि 2018-19 दरम्यान देशात गरिबी दरात घट झाली होती. कोरोना संकटात 2020 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक घडामोडी ठप्प पडल्या होत्या. या काळात लाखो लोकांना रोजगार गमवावे लागले. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली. मागील दशकभरात देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग खूपच कमी होता. फक्त दोन टक्के दराने जीडीपीत वाढ झाली. देशाच्या कृषी क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. गरिबीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Advertisement

कोरोना संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेस सुद्धा जोरदार झटका बसला आहे. डबघाईस आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे, कर्ज मिळवण्यासाठी देशाचे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचे दौरे करत आहेत. महागाई वाढली आहे, खाद्य पदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मध्यंतरी विजेचे दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, यावरूनही विरोधक आणि नागरिकांनी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता.

Advertisement

आर्थिकदृष्ट्या अत्यंत कंगाल असलेल्या पाकिस्तानला आता नवीन कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. देशात आर्थिक संकट असल्याने हा देश सातत्याने कर्ज घेत आहे. आताही गेल्या तीन दिवसात पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून तब्बल १३० अब्ज रुपयांचे कर्ज घेतले आहे. गुरुवारीच आयएमएफने पाकिस्तानला ५०० मिलियन डॉलर (३६,२२,३७,००,००० रुपये) कर्ज जाहीर केले. यानंतर, शुक्रवारी पाकिस्तान आणि जागतिक बँक यांच्यात १.३ अब्ज डॉलर्सच्या नव्या कर्जावर सहमती झाली. यापूर्वीच प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज झाले आहे.

Advertisement

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सध्या तणाव आहे. पाकिस्तानात सध्या आर्थिक संकट आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पाकिस्तानला सातत्याने कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे या देशावर आता कर्जाचा डोंगर झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा. 
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply