Take a fresh look at your lifestyle.

भारताने तर कमालच केली.. कोरोना संकटातही ‘या’ बाबतीत जगात नंबर वन; पहा, काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : कोरोना आला आणि या घातक विषाणूने आपण कधी विचारही केला नसेल असे बदल जगात घडवून आणले. दुकानात जाऊन खरेदी करण्यावर निर्बंध आले मात्र, ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड प्रचंड वाढला.. रोखीचे व्यवहार कमी झाले पण, डिजीटल व्यवहारात कोट्यावधींची भर पडली.. किरकोळ आणि घाऊक बाजारपेठेतील तर चित्रच पालटले आहे. कधी काळी मोबाइल घेण्यासाठी मोबाइलच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा मिळत नव्हती.. आज मात्र, ही दुकाने अगदी ओस पडली आहेत. कोरोनाने मोबाइल मार्केटला असा काही फटका दिला आहे, की ग्राहक आता ऑनलाइन मोबाइल खरेदीकडे वळले आहेत. याचाच परिणाम म्हणून आजमितीस डिजीटल व्यवहार, ऑनलाइन शॉपिंगमध्ये भारत आघाडीवर आहे. ऑनलाइन मोबाइल खरेदीतही भारताचाच डंका वाजत आहे. स्मार्टफोन्सच्या ऑनलाइन खरेदीत भारताने सर्वच देशांना मागे टाकले आहे आणि ते ही कोरोनाच्या संकटात…

Advertisement

‘काउंटर पॉईंट रिसर्च’ च्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. सर्व प्रमुख देशांमध्ये २०२० वर्षात भारतात मोबाईल फोनच्या विक्रीत ऑनलाईन चॅनेलची भागीदारी जवळपास ४५ टक्के होती. मागील वर्षी जागतिक मोबाईल फोन बाजारात ऑनलाईन विक्रीचा वाटा जवळपास 26 टक्के होता, म्हणजेच विक्री झालेल्या चार मोबाईल फोनपैकी एक ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यात आला होता.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे हा बदल झाला आहे. भारतात सर्वाधिक म्हणजेच ४५ टक्के ऑनलाइन खरेदी करण्यात आली. त्यानंतर त्यानंतर युकेमध्ये ३९ टक्के आणि चीनची ३४ टक्के भागीदारी होती. ऑनलाईन विक्रीमध्ये ब्राजिल ३२ टक्के, अमेरिका २४ टक्के, दक्षिण कोरिया १६ टक्के आणि नायजेरियामध्ये ८ टक्के भागीदारी होती.

Advertisement

‘मिंट’ ने दिलेल्या वृत्तानुसार, सन २०२० मध्ये ऑनलाइन स्मार्टफोन्सच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बाजारपेठेच्या आकाराच्या बाबतीत हे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी ‘इंटरनेट’, ‘स्मार्टफोन्स’ हे शब्द सुद्धा कुणाला माहित नव्हते. आज मात्र मोठे मेट्रो शहर असो किंवा एखादे छोटे खेडे, स्मार्टफोन दिसतोच. एकवेळ बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होईल पण, स्मार्टफोन हवाच, यामुळे देशात स्मार्टफोन्सचे युजर्स वेगाने वाढत आहेत. बाजारात एखादा नवीन स्मार्टफोन आला की अगदी काही तासातच कोट्यावधींचे फोन विकले जातात, अशी आताची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटातही मोबाइल मार्केटवर फारसा फरक झाल्याचे दिसले नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply