Take a fresh look at your lifestyle.

तर ‘त्या’ ४ कोटी लोकांची होईल उपासमार; पहा, कोणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा

दिल्ली : कोरोना काळात जगात अनेक संकटे आली आहेत. आताही एक नवे संकट घोंगावू लागले आहे. या संकटाचा फटका जगातील ४३ देशांना बसण्याची शक्यता संयुक्त राष्ट्र विश्व खाद्य कार्यक्रमने (डब्ल्यूएफपी) व्यक्त केली आहे. कारण, काही ठिकाणी खाद्य पदार्थांचा भीषण दुष्काळ जाणवत असून त्यामुळे तब्बल ४.१० कोटी लोक उपासमारीच्या संकटात भरडले जाऊ शकतात.

Advertisement

जगातील काही भागात आजही अन्न धान्याची टंचाई जाणवत आहे. विशेषतः आफ्रिकेतील देशात ही समस्या कायमच जाणवत असते. आताही येथील इथिओपिया, मेडागास्कर, दक्षिण सुडान आणि यमन या देशात भीषण दुष्काळ पडला असून यामुळे जवळपास ५ लाख ८४ हजार लोकांचे हाल होत आहेत. मेडागास्कर देशात तर इतका भीषण दुष्काळ पडला आहे, की येथील लोकांना जिवंत राहण्यासाठी अक्षरशः झाडाचा पाला, नाकतोड्यांसारखे कीटक खाणे भाग पडले आहे. येथील पिके पूर्णतः उद्धवस्त झाली आहेत, त्यामुळे अन्न धान्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे.

Advertisement

आता जगातील ४३ देशांना या संकटास सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी २०१९ मध्ये सुद्धा असेच संकट ओढवले होते, त्यात जवळपास २.७ कोटी लोकांची उपासमार झाली. त्यानंतर आता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. डब्ल्यूएफपीच्या मते, यावेळी उपासमारीच्या संकटात वाढ होण्यामागे आवश्यक खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमती, जागतिक हवामान बदल आणि आर्थिक संकट अशी काही कारणे आहेत. या संकटावर मात करण्यासाठी किमान सहा अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. या द्वारे संकटग्रस्त लोकांना खाद्य पदार्थांचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. या लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरेजेचे आहे, अन्यथा हे लोक उपासमारीच्या संकटात ढकलले जाऊ शकतात.

Advertisement

कोरोनाच्या काळात हे संकट जास्तच वाढले आहे. कारण, कोरोनाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. श्रीमंत देशांनी या संकटांचा सामना केला मात्र, गरीब देश भरडले गेले. विशेषतः आफ्रिकेतील देश या संकटाचा सामना करू शकले नाहीत. त्यामुळे आफ्रिका आणि नजीकच्या देशात खाद्यान्नाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या भागात अनेक देशात दुष्काळ पडला आहे. लोकांना अन्न धान्य मिळेनासे झाले आहे. कोरोना पाठोपाठ असे भीषण संकट आल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply