Take a fresh look at your lifestyle.

नफेखोरी भोवली..! शेअर बाजारात घसरण, अदानी समूहालाही झटका, आजची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : शेअर बाजाराची मंगळवारपर्यंत (ता.22) विक्रमी दिशेने सुरु असलेल्या वाटचालीला आज (बुधवारी) ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने मंगळवारी 53 हजारांच्या शिखराला स्पर्श केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Advertisement

दरम्यान, आज बाजार उघडताच सेनेक्स (Sensex) आणि निफ्टीची घसरण सुरु झाली. दुपारी साडेबारापर्यंत सेन्सेक्स 96 अंकांनी घसरुन 52492 च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी-फिफ्टीमध्येही 26 अंकाची घसरण होऊन हा निर्देशांक 15746 च्या स्तरावर पोहोचला होता.

Advertisement

मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व, हीरो मोटोकॉर्प, टायटन आणि हिंडाल्को कंपन्यांच्या समभागांची किंमत आज वधारली. विप्रो, श्री सीमेंट, अदानी पोर्ट, कोटक महिंद्रा आणि टीसीएस कंपनीच्या समभागांची किंमत घसरली. अदानी पोर्टचा समभाग 1.14 टक्क्यांनी घसरुन 734च्या पातळीवर पोहोचला.

Advertisement

मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 53012.52 वर पोहोचत नवी उंची गाठली होती. मात्र, नफेखोरीमुळे सेन्सेक्स 53 हजाराची पातळी फार काळ कायम राखू शकला नाही.

Advertisement

अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग मंगळवारी चांगलेच वधारले होते. अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे अदानी समूहाच्या संपत्तीत तब्बल 5 अब्ज डॉलर्सची भर पडली होती.

Advertisement

सोन्याच्या दरात दुसऱ्याही दिवशी
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) बाजारपेठेत सोन्याचा दर दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचला. आज सलग दिसऱ्या दिवशी MCX मध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑगस्ट वायद्याच्या सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढला. ऑगस्ट वायद्यासाठीच्या चांदीच्या दरात 0.42 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

Advertisement

MCX वर सोन्याचा दर 65 रुपयांनी वाढून प्रतितोळा 47,076 रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 1,780.06 डॉलर्स इतकी झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply