Take a fresh look at your lifestyle.

‘डिजिटल मिडिया’च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के; प्रदेशाध्यक्षपदी राजा माने, तर भोईटे राज्य उपाध्यक्ष

अहमदनगर : राज्यातील न्यूज पोर्टल आणि युट्युब संपादक व पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभा करण्यासाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. या संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजा माने यांनी राज्य कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार (पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र या विभागाची जबाबदारी अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि नगर सह्याद्रीचे संस्थापक-संपादक शिवाजी शिर्के यांच्याकडे देण्यात आलेली आहे.

Advertisement

शिर्के यांच्यासह विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आल्याची माहिती सचिव नंदकुमार सुतार यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे की, डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत.संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.

Advertisement
पदाधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी अशी
राज्य कार्यकारिणी सदस्य : सुरेश वांदिले (मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर), सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे (कोल्हापूर), पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी)
राज्य कायदा सल्लागार : अॅड. अतुल पाटील (पुणे)
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष : सुनिल उंबरे (पंढरपूर)
सरचिटणीस : नितीन पाटील (पुणे)
मराठवाडा उपाध्यक्ष : दिलीप माने (परभणी)
सरचिटणीस : देव शेजूळ (औरंगाबाद)
सोशल मिडिया प्रसिद्धी व राज्य समन्वयक : मोसिन शेख (औरंगाबाद)
सहसमन्वयक : सचिन डाकले (नवी मुंबई)
जिल्हा / शहर कार्यकारिणी पदाधिकारी : शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष), महेश कुगांवकर(सचिव, पुणे शहर), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), डॉ. सुनिल पाटील (सांगली जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), शंकर जाधव (सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष), प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे (इचलकरंजी अध्यक्ष), अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष), सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष) आदि.

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply