Take a fresh look at your lifestyle.

शिंकली की माशी.. काँग्रेससह ‘तो’ पक्ष म्हणजे कमजोर सहयोगी; ‘त्या’ नेत्याने हाणलाय टोला..!

दिल्ली : राजकारणात कोणीही कोणाचाही कायमचा शत्रू असेलच असे काहीही नाही. तरीही भारतात काँग्रेस आणि भाजप हेच दोन टोक आहेत. याच दोन पक्षात युती किंवा आघाडी होईल अशी शक्यता नाही. नाहीतर इतर सर्वच राजकीय पक्ष कधीही कोणाच्याही सोबतीला जाऊ शकतात. तसाच प्रकार न करता थेट स्वबळावर लढण्याची तयारी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे.

Advertisement

देशात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या समवेत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपला सक्षम असा विरोधक गट बांधण्याची त्यांनी तयारी केली आहे. त्याचवेळी आता अखिलेश यादव यांनी काँग्रेससह बहुजन समाज पार्टी यांना कमजोर सहयोगी असा टोमणा हाणला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपला रोखण्यासाठी तीन पक्षांची दुसरी आघाडी होण्याची शक्यता मावळली असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

मिशन २०२२ साठी उत्तरप्रदेशात राजकीय उलथापालथीचा काळ सुरू असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मायावती आणि कॉंग्रेस चांगले मित्रपक्ष नाहीत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेसशी पुन्हा युती करण्यास नकार दिला आहे.

Advertisement

ते म्हणाले की, मोठ्या पक्षांबाबत माझा अनुभव चांगला नव्हता. आम्ही त्यांच्याशी नाही तर छोट्या पक्षांशी गठबंधन करणार आहोत. यूपीमधील लोकांना आता बदल हवा आहे, त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल. राज्यातल्या 403 जागांपैकी सपाचे लक्ष्य जवळपास 350 जागा घेण्यावर आहे. लवकरच समाजवादी पक्षाचे सरकार येणार आहे. ज्यांना भाजपचा पराभव हवा आहे, त्यांनी सपाला मतदान करावे. बसपाचे काही नेते संपर्कात आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply