Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरवाढीचा ट्रेंड कायम; सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; पहा, काय आहेत नवीन दर

दिल्ली : देशात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. आज बुधवारी सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहे. सोन्याच्या दरात पुन्हा तेजी दिसत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात सोन्याचे भाव कमी झालेले नाहीत. सोन्यातील भाववाढीचा ट्रेंड तुर्तास तरी कायम आहे. आज सोन्याच्या दरात साधारण ९० रुपये प्रति तोळा आणि चांदीचे भाव १६० रुपयांनी वाढले आहेत.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सध्या सोन्याचा भाव ४७०७२ रुपये आहे. त्यात ६१ रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव ६७६६० रुपये असून त्यात १४५ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी सोन्याचा भाव ४६६६० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर तो ४६८०० रुपयांवर स्थिरावला. त्यात १५८ रुपयांची घसरण झाली होती. एक किलो चांदीचा भाव ६७५८० रुपयांपर्यंत खाली आला होता.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ११० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४७ हजार ११० रुपये आहे. राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्यासाठी ४६ हजार २६० रुपये मोजावे लागत आहेत. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५० हजार ३५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४ हजार ५५० रुपये तर २४ कॅरेटसाठी ४८ हजार ६०० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार २८० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ९८० रुपये आहे.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींचाही यावर परिणाम होत आहे.  भारतात सोने आणि चांदीच्या दरात सध्या असाच ट्रेंड सुरू आहे. या दोन्ही धातूंचे भाव सातत्याने बदलत आहेत. कोरोनाचे संकट असतानाही सोन्याचे दर ४५ हजारांच्या पुढे आहेत. मागील वर्षात पहिल्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.  त्यावेळी कोरोनाचे संकट नवीनच होते. लोकांमध्ये सुद्धा भितीचे वातावरण होते. त्यात लॉकडाऊनही होता. लोकांचे घराबाहेर पडणे कठीण झाले होते.  अशी परिस्थिती असतानाही सोन्याचे दर मात्र वाढतच होते. कोरोनाने सर्वच क्षेत्रांचे जबरदस्त नुकसान केले. मात्र, सोने आणि चांदीच्या बाजारावर या संकटाचा फारसा परिणाम झाला नाही. आताही दुसऱ्या लाटेत सोन्याचे दर पुन्हा वाढत चालले आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply