Take a fresh look at your lifestyle.

लोकांना शहाणपण येईना; कोरोनाचा धोका असतानाही नियमांचे भान नाही; पहा, काय म्हटलेय ‘त्या’ सर्वेत

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असला तरी धोका अजून टळलेला नाही. जगाच्या तुलनेत भारतास या घातक विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. हा विषाणू किती विध्वंस करू शकतो, हे भारतीयांनी प्रत्यक्षात अनुभवले आहे. मात्र, तरीदेखील लोक शहाणे होण्यास तयार नाहीत, या भयानक संकटातून धडा घेण्यास तयार नाहीत. नुकत्याच एका सर्वेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशात आजही बहुतांश नागरिक मास्क वापरण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे, असा दावा या सर्वेद्वारे करण्यात आला आहे. ऑनलाइन सोशल मीडिया मंच लोकल सर्किल ने केलेल्या सर्वेनुसार लसीकरण केंद्रांवर सुद्धा मास्क वापरण्याची तसदी लोक घेत नाहीत.

Advertisement

जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात दुसऱ्या लाटेने प्रचंड नुकसान केले. या सर्वेमध्ये सामील 67 टक्के लोकांनी मान्य केले की त्यांच्या जिल्ह्यात, शहरात लोक खूप कमी प्रमाणात मास्कचा वापर करतात आणि काही जण तर मास्क वापरत सुद्धा नाहीत. या सर्वेमध्ये देशातील 312 जिल्ह्यांतील जवळपास 33 हजार लोकांचा समावेश केला होता. 32 टक्के लोकांनी असे सांगितले की ज्यावेळी लसीकरण केंद्रावर गेलो त्यावेळी कमी प्रमाणात मास्क प्रोटोकॉलचे पालन करण्यात येत होते.

Advertisement

लसीकरण केल्यानंतरही काही जणांच्या घरातील सदस्य पुन्हा कोरोनाबाधित झाले, यामागे सुद्धा लसीकरण केंद्रांवर लोकांनी मास्क वापरण्याचे टाळल्याने कोरोना संक्रमण वाढले, असे सांगण्यात आले.
ही गोष्ट चिंताजनक असून यावर तत्काळ ठोस कार्यवाही करून लसीकरण केंद्रे कोरोना सुपरस्प्रेडर होणार नाहीत, याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे या सर्वेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

या सर्वेमध्ये असेही दिसून आले की 44 टक्के लोक कपड्याचा मास्क वापरतात. मात्र, हे कापडाचे मास्क अत्यधिक संक्रमक डेल्टा या प्रकारास रोखण्यास सक्षम नाहीत. कोरोना संक्रमण असणाऱ्या जिल्ह्यातील नागरीकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे 91 टक्के लोकांनी समर्थन केले, तर 8 टक्के लोकांनी या निर्णयाचा विरोध केला.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली.

Advertisement

देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.