Take a fresh look at your lifestyle.

भारीच… लस घेतली तर होईल पैशांची बचत; ‘या’ कंपनीने सुरू केलीय भन्नाट योजना

दिल्ली : कोरोनास रोखण्यासाठी आता लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहिमही सुरू आहे. लोक लस सुद्धा घेत आहेत. मात्र, देशात असेही लोक आहेत, ज्यांच्या मनात लसीकरणाबाबत शंका आहेत, अफवांनी मनात भिती निर्माण केली आहे.. त्यामुळे लस घेण्याची हिंमत होत नाही.. या अनाठायी कारणांचा लसीकरणावर परिणाम होत आहे. लस असतानाही लसीकरण मात्र होत नाही.

Advertisement

दुसरीकडे मात्र, लसीकरणाचा वेग वाढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तसेच खासगी कंपन्या अनेक योजना सुरू करत आहेत. आताही करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आघाडीची विमान कंपनी इंडिगोने तिकिटावर सवलत जाहीर केली आहे. लसीचा किमान एक डोस घेतला असल्यास संबंधित प्रवाशास तिकिटावर १० टक्के सवलत मिळेल, असे इंडिगोने जाहीर केले आहे. यासाठी प्रवाशाला विमानतळावरील कंपनीच्या काउंटरवर किंवा बोर्डिंग गेटवर लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे कंपनीने म्हटले आहे. राष्ट्रीय पातळीवरील लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने तिकीट दरावर सवलत देऊन प्रयत्न केला असल्याचे इंडिगोचे मुख्य महसूल अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले.

Advertisement

देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या लाटेस रोखायचे असेल तर लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने नुकताच एक सर्वे केला होता, यामध्ये आरोग्य तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांनी असे म्हंटले आहे, की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत देश तिसऱ्या लाटेचा मुकाबला अधिक सक्षमतेने करेल. जून महिन्यात हा सर्वे केला होता. यामध्ये काही जणांनी तिसरी लाट ऑक्टोबर मध्ये येईल असे म्हटले आहे. तर काही जणांनी ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येईल असे सांगितले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान देशात तिसरी लाट येईल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली.

Advertisement

देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply