Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून मारले थेट SP साहेबांना..! गडकरी यांच्या दौऱ्यात झाला ‘तो’ हंगामा..!

दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्यातील एक व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. या दौऱ्यात गडकरी साहेब येत असतानाच मुख्यमंत्री जयराम ठाकूर उपस्थित असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोर सुरक्षा अधिकाऱ्याने पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना लाथाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर कुल्लू पोलिस आणि मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी समोरासमोर आले आहेत. घटनास्थळी बरीच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री कुल्लू येथे आले होते.

Advertisement

News18 on Twitter: “#WATCH | Clash between SP Kullu Gaurav Singh and CM Jairam Thakur’s security In charge at Bhuntar Airport, Himachal Pradesh. https://t.co/ODTinUG67F” / Twitter

Advertisement

ही घटना भुंतर विमानतळाबाहेर घडली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रभारी अतिरिक्त एसपी बृजेश सूद यांना काहीतरी प्रकरणामुळे एसपी गौरव सिंग यांनी थप्पड मारल्याचा आरोप आहे. यानंतर बृजेश सूद यांनी एसपी साहेबांना लाथा मारल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा प्रभारीने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे एसपी गौरव सिंह यांचे म्हणणे आहे. यावर मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारने अजूनही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply