Take a fresh look at your lifestyle.

क्रिप्टोकरन्सीमागे लागलेय चिनी शुक्ल काष्ठ, बिटकाॅईनसह अन्य क्रिप्टोवर झालाय ‘हा’ परिणाम..!

नवी दिल्ली : क्रिप्टो करन्सी मार्केटमागे लागलेले शुक्ल काष्ठ काही संपताना दिसत नाही. चिनी सरकारने क्रिप्टो करन्सीला केलेल्या विरोधामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी मंदी आल्याचे चित्र आहे. जगभरात सर्वाधिक ट्रेड होणारे ‘बिटकॉइन’ आणि ‘इथेरियम’मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले.

Advertisement

मागील 24 तासात ‘बिटकॉइन’च्या किंमतीत तब्बल ९ टक्क्यांची घसरण झाली. सोबतच ‘इथेरियम’मध्येही तब्बल 8 टक्क्यांची घसरण दिसून आली. याशिवाय इतर क्रिप्टोकरन्सीजमध्येही मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वाधिक नुकसान ‘डोजकॉईन या क्रिप्टोकरन्सीचे झाले. डॉजकॉइनच्या किमती तब्बल 25 टक्क्यांनी घसरून थेट 0.17 डॉलर्सच्या खाली आल्या.

Advertisement

सध्या बिटकॉइनमध्ये पडझड सुरु असल्याने, गुंतवणूकदारही बिटकॉइनपासून दूर राहणेच पसंत करत आहेत. मंगळवारी (ता.22) सायंकाळी सहा वाजता बिटकॉइन 9.18 टक्के घसरून 29 हजार 571 डॉलर्सवर घसरला होता. भारतीय रुपयानुसार, एका बिटकॉइनची किंमत 22 लाखांच्या खाली आली होती. मागील आठवडाभरात बिटकॉइनच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Advertisement

‘इथेरियम’च्या किंमतीतही 8.55 टक्के घसरण दिसून आली. ‘इथेरियम’ 1802 डॉलर्सवर ट्रेड करत होता. ‘थेथर’ क्रिप्टोकरन्सी 1 डॉलरवर, तर बिनान्स कॉईनमध्ये 21.24 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली. बिनान्स कॉईन 240.24 डॉलर्सवर होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply