Take a fresh look at your lifestyle.

खरेदी केले काँग्रेसने, थकबाकी भरतेय मोदी सरकार; इंधनाच्या दरवाढीचे भाजपने दिलेय ‘भन्नाट’ कारण; पहा, नेमका काय आहे प्रकार

दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केलेली असताना काँग्रेसमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचा अजब दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.

Advertisement

‘काँग्रेसने २०१४ पूर्वीच तेल बॉन्ड घेऊन आपल्यावर लाखो-कोटी रुपयांची थकबाकी ठेवली. या थकबाकीचे मूळ आणि व्याजाची रक्कम आताच्या सरकारला द्यावी लागत आहे. त्यामुळे सुद्धा इंधनाच्या किंमती वाढत आहेत,’ असे वक्तव्य धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया येत आहेत. कम्युनिस्ट नेते सिताराम येचुरी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सांगितले, की धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीवरून जी कारणं पुढे केली आहेत ती सगळी जुनी आहेत. इंधनाच्या किमती वाढण्या मागचे खरे कारण सरकार सांगत नाही. इंधनांच्या किंमती वाढण्याचं कारण म्हणजे केंद्राकडून सतत वाढवण्यात आलेलं उत्पादन शुल्क. ही संपूर्ण रक्कम केंद्राकडे जाते. केंद्र सरकारकडून देशातील जनतेची लूट सुरू आहे. महागाई वाढण्याचे हेच कारण आहे, असे येचुरी यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही. आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताच विचार सरकारने केलेला नाही. उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे.

Advertisement

यावेळी पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून मिळाले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल 5.25 लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत. याच वेळी प्राप्तिकरातून मात्र सरकारला 4.69 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट करातून 4.57 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. याआधी सन 2019-20 या आर्थिक वर्षात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून सरकारला 4.23 लाख कोटी रुपये मिळाले होते. पुढील वर्षात मात्र यात तब्बल 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.