Take a fresh look at your lifestyle.

मापात पाप करणाऱ्या रेशन दुकानदारांना बसणार चाप, मोदी सरकारने केलाय ‘हा’ नवा नियम..!

मुंबई : वजनात झोलझाल करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार रेशनच्या दुकानांत ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ (EPOS) उपकरणांना इलेक्ट्रॉनिक तराजूशी जोडावे लागणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्याचे वजन करताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही. अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारने हा नियम आणला आहे.

Advertisement

देशातील 80 कोटी लोकांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमानुसार (NFSA) दरमहा पाच किलो तांदूळ व गहू माफक दरात दिला जातो. तर, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत केंद्र सरकार नोव्हेंबरपर्यंत रेशन कार्डधारकांना पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत वाटणार आहे.

Advertisement

दरम्यान, आता रेशनकार्डावर नाव, पत्ता यांसह माहितीतील चुका सुधारता येणार आहेत. कोठेही न जाता आपण हे काम घरबसल्या ऑनलाइन करू शकताे. तसेच, रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागेल.

Advertisement

ऑनलाइन पडताळणीनंतरही आपण नवीन सदस्याचे नाव जोडू शकताे. त्यात जुन्या रेशनकार्डमधून नाव काढून नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करावा लागेल. या सर्वांसाठी आपला नंबर नोंदविला जावा. मोबाइल नंबर रेशनकार्डशी लिंक केलेला नसेल, तर तो नोंदणी करण्यासाठी https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या संकेतस्थळाला भेट द्या. येथे आपल्याला आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर अद्ययावत करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply