Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. म्हणून घर बांधकामासाठी जादा पैसे मोजावे लागणार; बघा कसा बसणार खिशाला झटका..!

नवी दिल्ली :

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात देशात महागाईचा भडका उडाला आहे. खाद्यतेल आणि पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तू सुद्धा आवाक्याबाहेर चालल्या आहेत. इतके कमी म्हणून की काय आता घर बांधण्यासाठी सुद्धा जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Advertisement

कारण, देशभरात सिमेंटच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याआधी स्टीलचे भाव वाढले होते, त्यानंतर सिमेंटने सुद्धा नागरिकांच्या खिशाला ताण देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

जून महिन्यात सिमेंटच्या किमती वाढल्या आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज द्वारा लेटेस्ट डिलर्स चॅनेल चेक द्वारे मिळालेल्या माहितीनुसार सिमेंटच्या किंमती ४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आता पन्नास किलो सिमेंटच्या एका गोणीची किंमत ३७६ रुवपे झाली आहे. दक्षिण भारताचा विचार केला तर येथे सिमेंटच्या किमती तब्बल ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. येथील राज्यात सिमेंटच्या एका गोणीसाठी ४१५ रुपये मोजावे लागत आहेत. सिमेंटच्या मागणीत वाढ झाल्याने किमती वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

राज्ये अनलॉक होत आहेत, देशात बांधकामांचा वेग वाढला आहे, त्यामुळे सिमेंटच्या मागणीत वाढ होत आहे. सिमेंट कंपन्यांनी आपल्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये बचत करण्यासाठी मार्च महिन्यात सिमेंटच्या किमती वाढवल्या होत्या. आताही तोच ट्रेंड कायम आहे. त्यामुळे घर बांधकामासाठी आता सर्वसामान्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या संकटात रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. या काळात घर खरेदी करण्याचा विचार कोणीही करत नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गृहप्रकल्प सुद्धा रखडले आहेत. घरांना मागणीच नसल्याचे अशी परिस्थिती दिसून येत आहे.

Advertisement

तर दुसरीकडे बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ होत आहे. या वाढत्या किमतीमुळे सहाजिकच घरांच्या किमतीही वाढणार आहेत. मात्र, सध्या नवीन घर घेण्याचे नागरिकांना टाळलेच आहे. आता दुसरी लाट ओसरत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होत आहेत. दैनंदीन व्यवहार सुरळीत होत आहेत. रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात या परिस्थितीत सुधारणा होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळविण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply