Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा असाही ‘इफेक्ट’ ; ‘आरबीआय’ ने केलाय हा मोठा खुलासा; पहा, ‘त्या’ पद्धतीत कसा घडला बदल

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात बँकांमध्ये पैसे जमा करण्याचा आणि पैसे काढण्याचा ट्रेंडही बदलला आहे. आरबीआयने २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. ज्यामध्ये असे दिसून आले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बँकांमध्ये ठेवी वाढल्या आणि परिस्थिती नियंत्रित होताच लोकांनी पुन्हा बँक खात्यातून पैसे काढण्यास सुरुवात केली. २०२० च्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ठेवींचे प्रमाण जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ७.७ टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आले.

Advertisement

यावेळी लोकांनी बँक खात्यातून १,९९,६७८ कोटी रुपये काढले होते. गेल्या आठवड्यात रिजर्व्ह बॅंकेने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दोन लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. आरबीआयने तीन तिमाहींसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तपासणीत असे दिसून आले आहे, की कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा प्रसार वाढत होता, तेव्हा लोकांनी खात्यात बरीच रक्कम जमा केली होती. एप्रिल-जून २०२० मध्ये बँकांमध्ये ठेवी १,२५,८४८ कोटी रुपये होत्या. जुलै-सप्टेंबरमध्ये या ठेवी ३,६३,३४३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव थांबला आणि लोकांनी पुन्हा पैसे काढण्यास सुरुवात केली.

Advertisement

हा ट्रेंड कसा बदलला याबाबत जास्त माहिती बँकेने दिलेली नाही, मात्र कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातील अनिश्चितता लक्षात घेता लोकांनी बँकांमध्ये पैसे जमा केले, आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर पैसे काढण्यास सुरवात केली. लॉकडाऊनमुळे कारखाने बंद पडल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या.

Advertisement

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. खाद्यतेलांचे भाव वाढलेे आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्याही किमती वाढत चालल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. नागरिकांनाही पैशांची चणचण जाणवत आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. या सगळ्या गोष्टींसाठी पैसे तर पाहिजेच ना.  त्यातच दरवाढ झाल्याने नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे. या कारणांमुळे सुद्धा बँकेतील ठेवींचा ट्रेंड बदलला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.