Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पद्धतीने देशात होताहेत कोट्यावधींचे व्यवहार; पहा, पाच वर्षात ‘इतके’ वाढलेत डिजीटल व्यवहार

मुंबई

Advertisement

आजच्या डिजीटल युगात तंत्रज्ञानाचा वापर खूपच वाढला आहे. स्मार्टफोन आल्याने तर या क्षेत्रात क्रांतीच झाली आहे. काम कोणतेही असो, प्रश्न कोणताही असो, काहीही अडचण असो किंवा काही ज्ञानार्जन करायचे म्हटले तर या सगळ्या गोष्टींचे उत्तरे आज स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी घरबसल्या मिळवू शकता.

Advertisement

बँकेचे कामकाज असले तरी त्यासाठी आता बँकेत जाण्याची काहीच गरज राहिलेली नाही. बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा कुणाला पैसे द्यायचे असतील तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू शकता. आता तर चहा दुकाना, किराणा दुकान, भाजीपाल्याचे दुकान असो किंवा एखादे फायस्टार हॉटेल.. सगळीकडेच डिजीटल व्यवहारांचे चलन वाढले आहे. ‘गुगल पे’, ‘फोन पे’, ‘अॅमेझॉन पे’, ‘पेटीएम’ यांसारख्या ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (युपीआय) च्या माध्यमातून देशभरात प्रत्येक महिन्यास तब्बल १२२ कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत.

Advertisement

मागील पाच वर्षांच्या तुलनेत यामध्ये आता ५५० टक्के वाढ झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये १ हजार कोटी डिजीटल व्यवहार झाले होते. २०२०-२१ मध्ये मात्र ५ हजार ५५४ कोटी डिजीटल व्यवहार झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, कोरोना काळात २०२१ या वर्षात एप्रिल आणि मे या दोनच महिन्यात २०२० च्या तुलनेत डिजीटल व्यवहार १०० टक्क्यांनी वाढले आहेत.

Advertisement

मार्च २०२० मध्ये २.०६ लाख कोटी रुपयांचे युपीआय व्यवहार झाले. मार्च २०२१ मध्ये प्रमाण आणखी वाढले, या महिन्यात ५.०४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. तंत्रज्ञानात होत असलेले बदल यास कारणीभूत ठरले आहे. तंत्रज्ञान आधिक वेगाने विकसित होत असल्याने डिजीटल व्यवहार अगदीच कमी वेळात होत आहेत.

Advertisement

देशात ‘युपीआय’ ची सुरुवात सन २०१६ मध्ये करण्यात आली होती. युपीआय सुविधा घेण्यासाठी आधी वर्चुअस पेमेंट एड्रेस तयार करावा लागतो. त्यानंतर हा एड्रेस बँक खात्यास लिंक करावा लागतो. त्यानंतर बँक खाते नंबर, आयएफएससी कोड लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही. फक्त मोबाइल नंबर असला तरी व्यवहार करता येतात. कुणाला पैसे पाठवायचे असतील तर फक्त युपीआय आयडीची आवश्यकता असते. युपीआय एक सुरक्षित बँकिंग माध्यम आहे. आज देशात कोट्यावधी नागरिक या माध्यमाद्वारे डिजीटल व्यवहार करत आहेत.

Advertisement

दरम्यान,  मोबाइल पेमेंटच्या बाबतीत देशात सध्या पेटीएम आघाडीवर आहे. त्यामुळे कंपनी आता या वर्षातील ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत तब्बल २२ हजार कोटींचे ‘आयपीओ’ लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply