Take a fresh look at your lifestyle.

झाला बट्ट्याबोळ.. म्हणून अमेरिकन लस अडकली कागदपत्रांच्या फेऱ्यात; पहा नेमके काय झालेय..!

मुंबई : भारतातील सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कोव्हाक्सीन यांच्यासह रशियन स्पुटनिक-व्ही लस मिळण्यात सध्या अनेक अडचणी येत आहेत. सरकारकडून याचे उत्सव साजरे केले जात असले तरी एकूण लोकसंख्या आणि लसचा पुरवठा याचे गणित अजूनही जुळलेले नाही. त्यातच आता अमेरिकन लस भारतात येण्यास ऑगस्ट महिना उजाडणार आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञांसह नागरिकांना याची चिंता वाटत आहे.

Advertisement

भारत सरकार व कंपनी यांच्यातील उत्तरदायित्वाच्या अटीबाबतची सहमती आतापर्यंत कागदावर येऊ शकलेली नाही. लसीचा दुष्परिणाम झाल्यास कंपनीची जबाबदारी राहू नये, या अटीवर हे घोडे अडलेले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ही अट मान्य असल्याचे महिन्यापूर्वीच म्हटले होते. मात्र, ते कागदावर येऊ न शकल्याने अमेरिकन कंपनीची ही लस येण्यातील अडचणी वाढलेल्या आहेत.

Advertisement

दैनिक भास्कर या राष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबतीत बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, जुलैतच लस देण्याचे नियोजन कंपनीने केले होते. मात्र, कागदोपत्री सोपस्कार पूर्ण न झाल्याने आता ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरमध्येच भारताला लसीचा पुरवठा होऊ शकेल. त्यातही आणखी दफ्तरदिरंगाई झाल्यास आणखी उशीर होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

केंद्र सरकारऐवजी राज्ये कंपनीशी थेट संपर्क करत असल्याचे भारत हा एकमेव उदाहरण असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळेही उशीर झाल्याचे त्यांनी निर्देशित केले आहे. एकूणच केंद्राच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत असल्याचे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झालेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply