Take a fresh look at your lifestyle.

वाढली चीनची डोकेदुखी; पहा नेमके काय प्रकरण उद्भवलेय त्या देशात..!

दिल्ली : करोना विषाणूचा उगम नेमका कुठून झाला यावर संशोधकांना आणि जगाला मदत न करणाऱ्या चीनमध्ये करोनाचे नेमके काय झाले, यावर जगाला चिंता आहे. कारण पोलादी भिंतीच्या पल्याड नेमके काय चालू आहे हेच समजेनासे झालेले आहे. इथला करोना आटोक्यात आल्याच्या वावड्या उठत असतानाच पुन्हा एकदा करोनाने चीनला अडचणीत आणल्याच्याही बातम्या येत आहेत.

Advertisement

ग्वांगदोंग प्रांतात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. या प्रांतात आतापर्यंत कोरोनाची जितकी प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील ९० टक्के प्रकरणे एकट्या राजधानी ग्वांगझोऊ शहरातील आहेत. भविष्यातील धोका पाहता येथे कडक लॉकडाऊन केला आहे. त्यानंतर आता डोंग्गूआन शहरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या शहरात सुद्धा कडक निर्बंध लागू केले आहेत. शहरातील लोकांना शहराबाहेर जाण्यास बंदी आहे. कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

अवघ्या जगालाच कोरोना महामारीच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या चीनला कोरोना पुन्हा छळू लागला आहे. ग्वांगदोंग प्रांतातील आणखी एका शहरात कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. डोंग्गूआन या शहरात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. भविष्यातील धोका पाहता शहरात तत्काळ तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर चीनच्या हलगर्जीपणामुळे हा आजार जगभरात पसरला. कोट्यावधी लोक संक्रमित झाले. लाखो लोकांचे प्राण गेले. आजही काही देश या संकटात पुरते फसले आहेत. दुसरीकडे चीनने मात्र कठोर नियमांची अंमलबजावणी करत या विषाणूवर नियंत्रण मिळवले.

Advertisement

चीनने लगेचच तसे दावे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीनमधून कोरोनाच्या फारशा बातम्याही येत नव्हत्या. त्यामुळे चीनने जगाला कोरोना दिला मात्र, स्वतः त्यावर ताबडतोब नियंत्रण मिळवले, असेच लोकांना वाटत होते. मात्र, ग्वांगदोंग प्रांतातील दोन शहरात कोरोना पुन्हा वेगाने फैलावत असल्याचे समोर आल्यानंतर चीनचा हा दावा खोटाच असल्याचे आपोआपच सिद्ध झाले आहे.

Advertisement

दरम्यान, चीनप्रमाणेत ब्रिटेन, रशिया या देशात सुद्धा कोरोना पुन्हा वेगाने फैलावत आहे. ब्रिटेनमध्ये मागील २४ तासात कोरोनाचे २८४ रुग्ण सापडले. आता या देशात कोरोनाचे ४६ लाख ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे येथे रुग्ण वाढत चालले आहेत. रशियातही परिस्थिती खराब होत आहे. येथे मागील २४ तासात १७ हजार ३७८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाख ३४ हजार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply