Take a fresh look at your lifestyle.

व्हिडिओकॉन दिवाळखोरीत..! समूहातील 12 कंपन्यांबाबत घेतला मोठा निर्णय, आता गुतंवणूकदाराचे काय होणार..?

नवी दिल्ली : कर्जात बुडालेल्या व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सध्या ट्रेडिंग बंद आहे. ‘व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड’ आणि ‘व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. शेअर बाजारात या दोन कंपन्या सूचिबद्ध होत्या. मात्र, आता त्यांच्या शेअरची किंमत शून्य झाली आहे.

Advertisement

व्हिडिओकॉन ग्रुपमधील 12 कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात येणार असून, त्याची एकच कंपनी होणार आहे. ही नवीन कंपनी ‘वेदांता समूहा’च्या मालकीची असेल. व्हिडिओकॉन (Videocon)ची टेलिकॉम कंपनी व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्स देखील नव्या एंटिटीची सहाय्यक कंपनी असेल.

Advertisement

व्हिडिओकॉनच्या या रिझोल्यूशन योजनेला पाठिंबा देणार्‍या वित्तीय संस्थांना या नवीन कंपनीत 8 टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वेदांता इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मूल्य उद्योगांचे शेअर्स वेगळे केले जाणार आहेत.

Advertisement

व्हिडीओकॉन ग्रुप ऑफ कंपनी एकाच कंपनीत विलीन झाल्यावर आणि वेदांता समूहाने त्याचे अधिग्रहण केल्यानंतर नवीन कंपनीचे भविष्य अधिक चांगले असेल, अशी अपेक्षा फायनान्शियल क्रेडिटर्सला आहे. या नव्या कंपनीतच बँकांचा 8 टक्के हिस्सा असेल.

Advertisement

व्हिडिओकॉनमध्ये Applicomp CE या घरगुती उपकरणे बनविण्याऱ्या कंपनीचे विलीनीकरण केला जाणार आहे. ही कंपनी रेफ्रिजरेटर, मोबाईल, एलईडी टीव्ही अशी उत्पादने तयार करते. इतर कंपन्यांमध्ये इव्हान्स फ्रेझर, मिलेनियम अप्लायन्सेस, इलेक्ट्रो वर्ल्ड डिजिटल सोल्यूशन्स, टेक्नो कार्ट इंडिया, सेंचुरी अप्लायन्सेस, टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स, व्हॅल्यू इंडस्ट्रीज, पीई इलेक्ट्रॉनिक्स, सीई इंडिया आणि स्काय अप्लायसेस यांचा समावेश आहे.

Advertisement

व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला एसबीआय, आयडीबीआय बँक, युनियन बँक यांच्यासह अनेक बँकांनी कर्ज दिले आहे. वेदांता ट्विन स्टार टेक्नॉलॉजी (Twin Star Technology)च्या मदतीने व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनीचे अधिग्रहण केले जाणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply