Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ दोन बॅंकांचे होणार खासगीकरण, ग्राहक व गुंतवणुकदारांवर होणार असा परिणाम..!

नवी दिल्ली : थकीत कर्ज वाढत गेल्याने अडचणीत आलेल्या सरकारी बॅंका, तसेच कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या संस्थांमधील आपला हिस्सा विकून केंद्र सरकार निधी गोळा करणार आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्या, बँकांमधील हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

मोदी सरकारने देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (central bank of India) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (Indian overseas bank) अशी त्यांची नावे आहेत. निर्गुंतवणुकीच्या (Disinvestment) प्रक्रिये अंतर्गत सरकार सुरुवातीला या दोन बँकांमधील आपला 51 टक्के हिस्सा विकणार असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळीच सरकारने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँकेसह एका विमा कंपनीचे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली होती. नंतर सरकारने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘बँक ऑफ इंडिया’ (Bank of India) यामधील हिस्सा विकण्याचाही निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या चारही बँकांच्या स्थितीचा आढावा घेऊन प्राधान्यक्रमानं नाव सुचवण्याची जबाबदारी नीती आयोगावर सोपविली होती.

Advertisement

नीती आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीलाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नावे सचिवांच्या कोअर कमिटीकडे सादर केली. त्यांच्या अहवालानुसार, आता केंद्र सरकारनं ‘सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन ओव्हरसीज’ बँकेतील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकांच्या खासगीकरणासाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा केल्या जाणार आहेत. सरकार याबाबत रिझर्व्ह बँकेशीही चर्चा करुन कार्यवाही करणार आहे.

Advertisement

सरकारी बॅंकेचे खासगीकरण होणार असल्याची बातमी येताच, त्याचा शेअर बाजारात परिणाम दिसून आला. सेन्ट्रल बँकेचा शेअर 20 टक्क्यांनी वधारून 24.30 रुपयांवर पोहोचला, तर इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर 19.80 टक्क्यांनी वधारून 23.60 रुपये या वार्षिक उच्च स्तरावर पोहोचला होता.

Advertisement

दरम्यान, बँकांचे खासगीकरण झाल्यास, कर्मचारी, ग्राहकांचे काय होणार, याबाबत चर्चा सुरू होती. या बँकाच्या खासगीकरणाबाबतही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 मार्च रोजी जाहीर केले होते की, बॅंकामधील कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यांच्या पगारापासून पेन्शनपर्यंत सर्व काळजी घेतली जाईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply