Take a fresh look at your lifestyle.

बारामती व मुंबईतील सहकारी बॅंकांवर ‘आरबीआय’ची मोठी कारवाई, तुमचे पैसे नाहीत ना या बँकांमध्ये..?

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आता बारामती व मुंबईतील सहकारी बॅंका आल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘आरबीआय’ने या सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे ग्राहकही चिंतेत पडले आहेत.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ‘आरबीआय’ने गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

Advertisement

आता मुंबईतील मोगावीरा सहकारी बँक लिमिडेटसह तीन बँकावर ‘आरबीआय’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. या तिन्ही बँकांना 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Advertisement

मोगावीरा सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अहवालात अनियमतता आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. बँकेतील निष्क्रिय खात्यांचे अनेक वर्षांपासून ऑडिट झाले नव्हते. तसेच DEA फंडातील अनेक व्यवहार संशयास्पद आढळून आले. मोगावीरा बँकेने जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत (Advance) व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. या बँकेत जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था नसल्याचे रिझर्व्ह बँकेने अहवालात नमूद केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply