Take a fresh look at your lifestyle.

‘राष्ट्रमंचा’वर पवार-किशोर यांचीच छाप; आज संध्याकाळी ठरणार नेमकी दिशा.. नाहीतर..?

मुंबई : तीन वर्षांनी होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन अगोदरच मोर्चेबांधणी करायच्या उद्देशाने आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्येच केंद्रातील प्रबळ सत्ताधारी भाजपचा एकजुटीने मुकाबला करण्यासाठी तिसरी आघाडी उभारण्याचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचीच या बैठकीवर खऱ्या अर्थाने छाप आहे.

Advertisement

देशाच्या राजकारण या दोन्ही व्यक्तींना महत्वाचे स्थान आहे. त्यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतल्यानंतर देशभरात वेगवान घडामोडी घडत आहेत. माजी अर्थमंत्री व पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींंचे कट्टर विरोधक यशवंत सिन्हा यांनी सन २०१८ मध्ये ‘राष्ट्रमंच’ची स्थापना केली होती. त्याच ‘राष्ट्रमंच’च्या वतीने बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं यांना दणदणीत यश आणि  बंगालसोबतच तामिळनाडूत द्रमुकला विजयी करण्यासाठी प्रशांत यांनीच रणनीती तयार केली होती. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ममतादीदींसाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न म्हणून प्रशांत किशोर प्रयत्न करीत असल्याचे म्हटले जात आहे. त्याला कितपत यश येते किंवा कोणती दिशा मिळते हे आज होणाऱ्या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.