Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीने खाल्ला भाव..! पहा कशी राहिली सराफ बाजारातील आजची परिस्थिती..?

मुंबई : सोनं हा भारतीयांसाठी कायम विशेष गोष्ट राहिली आहे. सोनं मिरवण्यापुरतच नव्हे, तर भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणुक करीत असतात. मागील काही वर्षांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनेखरेदी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. या आठवड्यातही सोनेबाजारात मोठी पडझड दिसुन आली. सोन्या-चांदीच्या दरात आजही घसरण झाली.

Advertisement

सोन्याच्या दरात आज प्रति तोळा 100 रुपयांची घट झाली. ‘एमसीएक्स’वर आज सोन्याचा भाव 47 हजार 120 रुपये प्रति तोळा होते. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात आज किरकोळ वाढ झाली. प्रती किलो चांदीमागे 200 रुपयांची वाढ झाली. सध्या ‘एमसीएक्स’वर चांदीचा दर 67 हजार 800 रुपये प्रती किलो राहिला.

Advertisement

सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा फरक पडत असला, तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकत असल्याचे दिसले आहे.

Advertisement

बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून, या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply