Take a fresh look at your lifestyle.

राजकारण जोमात पण.. ‘त्या’ दोन मुद्द्यांमुळे मनपा-झेडपी निवडणुका लांबणीवर पडणार..?

नाशिक : सध्या अवघ्या महाराष्ट्र राज्याला कधी एकदा करोना संकट संपतेय आणि महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका होतात असेच झालेले आहे. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक अडचणी आहेत. यातील पहिली अडचण म्हणजे आरक्षणाची आणि दुसरी अर्थातच करोना विषाणूच्या भीतीची..!

Advertisement

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये बोलताना म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी विनंती मी आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह  सरकार या याबाबत सकारात्मक आहे. कोणाचा कितीही दबाव आला तरी सरकारने निवडणुका घेऊ नये अशी आमची भूमिका आहे.

Advertisement

तर, कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, राज्यात ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही. तर, भाजपचा आंदोलनात्मक पवित्रा म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका करताना वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर २६ आणि २७ जूनला होणाऱ्या सर्वपक्षीय नेते व ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply