Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसने ‘तसल्या’ भानगडीत न पडता ‘हे’ करावे; यशवंत सिन्हा यांनी दिलाय महत्वाचा सल्ला

दिल्ली : कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आणि भाजप विरोधी असलेल्या मित्रपक्षांचे जमेल असेच काहीही नाही. त्यामुळेच आता देशातील सत्तांतराची गरज लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने गांभीर्य दाखवण्याची गरज आहे. नेता कोण आणि नंतर काय असल्या भानगडीत न पडता थेट भाजपच्या विरोधातील आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेण्याचे आवाहन माजी अर्थमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

Advertisement

ते म्हणाले, की ‘देशातील विरोधकांनी आता एकत्र यायला हवे. चांगल्या परिस्थितीची वाट पाहण्यात आता अर्थ नाही. काँग्रेसने गांभीर्य दाखवून बरोबर आले पाहिजे. कोण नेता असेल या भानगडीत सध्या पडू नये. सर्वजण मिळून पंतप्रधान ठरवतील,’ असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या कारभारावर सुद्धा त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Advertisement

‘केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाहीत. पॅकेजचा सुद्धा काहीच सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय अपयशी ठरला आहे,’ असेच म्हणावे लागेल. चीनच्या बाबतीत सुद्धा सरकारला अपयश आले आहे. चीनने देशाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. डोकलाममध्ये सुद्धा धोका वाढला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला जोरदार झटका बसला आहे. सर्व ताकद झोकून दिल्यानंतर सुद्धा या राज्यात पक्षाचा पराभव झाला. या निवडणुकांचा देशाच्या राजकारणावर परिणाम झाला आहे. भाजपला पराभूत करणे शक्य आहे, असे या निवडणुकीच्या निकालावरून दिसले आहे. त्यानंतर आता देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच मुद्द्यावर माजी अर्थमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच भाजपच्या कारभारावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

Advertisement

केंद्राचा मोफत लसीकरणाचा निर्णय मात्र योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, आज कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर आता लसीकरण हाच पर्याय आहे, असेही त्यांनी सांगितले. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळ पासून सिन्हा केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. याआधीही त्यांनी अनेकदा भाजपवर टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, देशात एप्रिल महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विशेष म्हणावे असे यश मिळाले नाही. बंगाल राज्यावर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले होते. या राज्यात विजय मिळेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटत होते. त्यामुळे तर ऐन कोरोनाच्या संकटात सुद्धा भाजप नेते, केंद्रीय मंत्र्यांनी येथे धुवाधार प्रचार केला. जाहीर सभा काय, रोड शो काय, जिकडे पहावे तिकडे गर्दीच गर्दी.. मात्र, या गर्दीचे मतपेटीत रूपांतर झाले नाही आणि या महत्वाच्या राज्यात पक्षाला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या राज्याच्या निवडणुकीचा परिणाम देशाच्या राजकारणावर झाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply