Take a fresh look at your lifestyle.

चीनची मुजोरी इतरही देशांना भोवतेय; म्हणून ऑस्ट्रेलियावर आलीय ‘ती’ वेळ, वाचा महत्वाची बातमी

दिल्ली : चीनने आता ऑस्ट्रेलियास त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने मात्र याचा विरोध करण्याचे ठरवले असून जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करण्याचे निश्चित केले आहे. या देशास चीन विरोधात तक्रार देण्याची वेळ आली आहे. भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांना असे कोंडीत पकडण्याचा या मुजोर देशाचा प्लान आहे.

Advertisement

कारण, चीनने दारूच्या निर्यातीवर टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चीन विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसे पाहिले तर, काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. चीनने मागील वर्षात ऑस्ट्रेलियाच्या मद्यावर तब्बल 218 टक्के टॅक्समध्ये वाढ केली होती.

Advertisement

चीनच्या वाढत्या दादागिरीस जगातील अनेक देश वैतागले आहेत. चीनचा त्रास आता जास्तच वाढत चालला आहे. कोरोनाने जगभरात बदनामी केली असली तरी चीनला त्याचे काहीच वाटत नाही. उलट या संकटाच्या काळातही चीनने कुटील डाव सोडलेले नाहीत. कोणत्या देशास कधी त्रास द्यायचा, हे चीनच्या राज्यकर्त्यांना चांगलेच ठाऊक आहे. जुने वाद लक्षात ठेवत दुसऱ्या देशांना त्रास देण्याचे उद्योग चीन करत आहे.

Advertisement

कोरोना विषाणूचा उगम आणि चिनी कंपनी हुवावेस 5 जी नेटवर्क बनवण्यास ऑस्ट्रेलियाने विरोध केल्यानंतर या दोन्ही देशात वाद सुरू झाले आहेत. याच कारणामुळे चीनने ऑस्ट्रेलियास त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या देशाच्या अडचणी वाढल्या आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी ऑस्ट्रेलिया जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार करणार आहे. मात्र, येथे ऑस्ट्रेलियास यश मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, चीनने जागतिक व्यापार संघटने बरोबर संबंध खूप कमी केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निकाल लागण्यास बराच काळ जाण्याची शक्यता आहे. तसेच याद्वारे काही खास आर्थिक प्रभाव पडण्याची शक्यता सुद्धा कमीच आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.