Take a fresh look at your lifestyle.

चीनला बसणार मोठाच झटका; अमेरिकेने केलाय ‘तसा’ प्लान, जगाचे लागले लक्ष

दिल्ली : करोनाचा फादर कोण, असा मोठा मुद्दा जागतिक राजकारणात चर्चेत आहे. कारण, या जीवघेण्या विषाणूचे पालकत्व घ्यायला कोणीही तयार नाही. मात्र, जगभरात हा विषाणू चीनमधून पसरला असल्याने आता सगळ्यांनी याचे पालकत्व चीनला देण्यासाठीचा प्रयत्न चालवला आहे. त्यात अमेरिका थेट शड्डू ठोकून आहे. त्याचाच भाग म्हून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा करताना काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे मिळण्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

जगभरातील विविध नामांकित संस्थांचे अहवालही चीनकडेच बोट दाखवत आहेत. हा विषाणू प्रयोगशाळेतूनच वुहान पसरल्याची शक्यता त्यातून व्यक्त केली गेली आहे. आता अमेरिकेने तर चीनला थेट धमकीच दिली आहे. कोरोना विषाणूच्या उगमाप्रकरणी चीनने सहकार्य न केल्यास जगात एकटे पाडले जाईल, असे अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या धमकीमुळे कोरोनाचे चिघळत चालले आहे. सुलिवन यांनी कोरोना विषाणूचा उत्पत्तीप्रकरणी शोधकार्य सुरू असून चीननेसुद्धा यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. तरी देखील चीनने सहकार्य केले नाही तर या देशास जगात आइसोलेशनच्या संकटास सामोरे जावे लागेल, असेच त्यांनी सांगितले.

Advertisement

अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनीही चीनवर संशय व्यक्त करताना एका मुलाखतीत म्हटले आहे की, कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेतच तयार केलेला असू शकतो. चीनच्या अभ्यासकांनी म्हटले होते की, वटवाघळात नवीन कोरोना विषाणू मिळाले असून यामध्ये कोविड 19 महामारी फैलावणाऱ्या SARS-CoV-2 सारखा विषाणूसुद्धा आहे. या अभ्यासासाठी त्यांनी मे 2019 पासूनच नमुने घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान प्रांतात कोरोना वेगाने फैलावण्यास सुरुवात झाली होती.

Advertisement

सीएनएनच्या रिपोर्ट नुसार या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे, की दक्षिण-पश्चिम चीनमध्ये केलेल्या अध्ययनातून असे लक्षात येते की वटवाघळामध्ये किती कोरोना विषाणू असतात आणि यातील किती विषाणू माणसांमध्ये पसरू शकतात. सेल पत्रिकेत प्रकाशित रिपोर्टमध्ये शाडोंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की वटवाघळांच्या वेगवेगळ्या प्रजातींपासून आतापर्यंत एकूण 24 कोरोना वायरस जीनोम एकत्रित केले आहेत. यातील चार SARS-CoV-2 सारखे आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply