Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पाकिस्तानच तो.. भारताच्या राफेल व मिग-२९ ला टक्कर देण्यासाठी केलीय ‘ही’ तयारी..!

दिल्ली : भारताला फ्रांसच्या कंपनीकडून राफेल विमान मिळण्यास सुरुवात झाल्याने भारतीय वायुसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, भारताचे शेजारील देश चीन आणि पाकिस्तानही आपली लष्करी क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण, भारताची ताकद असलेल्या राफेल व मिग-२९ ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने जेएफ-१७ विमानासह तयारी सुरू केलेली आहे.

Advertisement

पाकिस्तानचे जेएफ-१७ ही लढाऊ विमाने सध्या तुर्कीमध्ये राफेल या लढाऊ विमानांसह ‘युद्ध’ लढत आहेत. तिथे वापरली जाणारी राफेलची लढाऊ विमाने ही कतारच्या हवाई दलाचे आहेत. त्यांना फ्रान्सकडून ही विमाने विकत मिळाली आहेत. ही राफेल विमाने सध्या टर्कीमध्ये सुरू असलेल्या हवाई अभ्यासामध्ये आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तान वायुसेनाही मिग-२९ या लढाऊ विमानांसह यामध्ये युद्धाचा सराव करत आहे. सध्या Anatolian Eagle 2021 चा अभ्यास तुर्की व पाकिस्तानमध्ये सुरू आहे. यात कतारचे राफेल लढाऊ विमान, अझरबैजानचे दोन मिग २९ आणि पाकिस्तानचे पाच जेएफ-१७ विमाने सहभागी होत आहेत.

Advertisement

FC1 on Twitter: “Relatively newer and fresh looking Block-IIs arriving in Konya Airbase Turkey for Anatolian Eagle 2021. Looks like PAF means business this time around. #JF17 #AnatolianEagle2021 https://t.co/SJImgYxrAZ” / Twitter

Advertisement

याद्वारे पाकिस्तानला दोन्ही विमानांबद्दल खूप महत्वाची माहिती मिळू शकते. ही दोन्ही विमाने भारतीय हवाई दलाकडून प्रामुख्याने वापरली जात आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी पायलट आता दोन्ही लढाऊ विमानांशी कसे युद्ध करावे हे शिकू शकतात. पाकिस्तानच्या या प्रयत्नात तुर्कीही मदत करत असल्याचा त्यांना विश्वास आहे. तुर्कस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार हा अभ्यास ३ जुलैपर्यंत चालेल. तुर्कीचा असा दावा आहे की, या अभ्यासाचा हेतू फ़क़्त एकमेकांकडून युद्धकौशल्य शिकणे हाच आहे. एकमेकांशी माहिती, लढाऊ कौशल्ये आणि अनुभव करणेदेखील यात समाविष्ट आहे. यादरम्यान सर्व वैमानिक पूर्णपणे युद्धसदृश परिस्थितीत सराव करीत आहेत. प्रशिक्षण पातळी वाढवण्यासाठी या अभ्यासामध्ये बांगलादेश, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया, इराक, स्वीडन, कोसोवो, मलेशिया, ओमान, जॉर्डन आणि जपान यांना निरीक्षक दर्जा आहे.

Advertisement

Shahid Raza on Twitter: “Pakistani Jeffs come face to face with Qatari Rafales and Azeri Mig-29s in the #AnatolianEagle2021 exercise in #Turkey. Considering both the Rafale and Fulcrum are in service with @IAF_MCC, making it an invaluable tactical training opportunity for PAF. https://t.co/LGOgU1fBt6” / Twitter

Advertisement

जेएफ-१७ थंडर ब्लॉक-३ या लढाऊ विमानांना पाकिस्तानच्या हवाई दलात समाविष्ट केले गेले आहे. पाकिस्तानने चीनच्या मदतीनेच ही नवी लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये तयार केली आहेत. पाकिस्तानने म्हटले आहे की, ही विमाने अत्याधुनिक रडार प्रणालींनी सुसज्ज आहेत. जे लांब पल्ल्याच्या पाळत ठेवण्यावर आणि हवाई हल्ल्याच्या क्षमतेस सक्षम आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी असा दावा केला की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्यानंतर या विमानांनी युद्धात आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply