Take a fresh look at your lifestyle.

वर्षभरात दुसऱ्यांदा पगारवाढ..! ‘या’ कंपनीतील कामगारांची चांदी, पहा किती पगारवाढ मिळणार आहे..?

नवी दिल्ली : कोरोनामुळं माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रही अडचणीत आल्याची चर्चा होती. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमधील ३० लाख नोकऱ्या धोक्यात आल्याचा अहवाल जाहीर झाला होता. दुसरीकडे ‘नॅसकाॅम’ संस्थेने आयटी सेवा क्षेत्रात नोकऱ्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कोरोनामुळे उद्योगाला झळ बसली असली, तरी दुसऱ्या बाजूला आयटी सेवा पुरवठादार कंपन्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देत आहेत.

Advertisement

कोरोना संकटात कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल जाणून माहिती आणि तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोने (Wipro) कर्मचाऱ्यांना वर्षभरात दुसऱ्यांदा वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. विप्रो कंपनी येत्या सप्टेंबरपासून 80 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतनवाढ देणार आहे.

Advertisement

कंपनीने यापूर्वी जानेवारीत वेतनवाढ दिली होती. त्यात असिस्टंट मॅनेजर, त्याखालील कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ दिली होती. मॅनेजर आणि त्यावरील पदांसाठी १ जूनपासून वेतनवाढ केल्याची घोषणा केली होती.
तसेच, परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ८ ते ९ टक्के वाढ करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. ऑनलाइन काम करणाऱ्या मधल्या फळीतील कर्मचाऱ्यांना ५ ते ६ टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे. त्याशिवाय चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ मिळणार आहे.

Advertisement

‘इन्फोसिस’ने (Infosys) देखील जुलैपासून दुसऱ्यांदा वेतनवाढ देण्याची तयारी केली आहे. जानेवारीतही या कंपनीने वेतनवाढ दिली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीने आपल्या ४ लाख ८९ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिलमध्ये वेतनवाढ दिली होती. देशातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्यांमध्ये जवळपास १२ लाखांहून अधिक रोजगार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.