Take a fresh look at your lifestyle.

युपी एटीएसची मोठी कारवाई; ISI च्या मदतीने भारतात ‘हे’ कृत्य करीत असल्याने दोन मौलवी अटकेत..!

दिल्ली : धर्मांतर हा मुद्दा सध्या देशात आरोग्याच्या मुद्द्यापेक्षा खूपच मोठा झालेला आहे. कारण, प्रत्येक धर्मीयांची आपल्या धर्माप्रती असलेली आस्था आणि त्यावर राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा यात हा मुद्दा खूपच मोठा झालेला आहे. अशाच प्रकरणात उत्तरप्रदेश राज्याच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय यांच्या मदतीने काम करणाऱ्या दोन मौलवींना अटक करण्यात आलेली आहे.

Advertisement

मोटिवेशनल थॉटद्वारे हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. एटीएसने दोन मौलानांना लखनऊ येथून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मौलाना जहांगीर आणि उमर गौतम हे लखनऊमधील एका मोठ्या मुस्लिम संघटनेशी संबंधित असून ते गरीब हिंदूंना लक्ष्य करून धर्मांतर करण्यासाठी बाध्य करीत असल्याचा आरोप टीएस अधिकाऱ्यांनी केला आहे.

Advertisement

सुमारे एक हजार लोकांचे धर्मांतर त्यांनी केले असून त्यात मोठ्या संख्येने मूकबधिर आणि महिलांचा समावेश असल्याचे म्हंटले जात आहे. अटक केलेले दोघेही पश्चिम यूपीमधील रहिवासी असून परदेशातून कार्यरत असलेली एक मुस्लिम संघटना त्यांना आर्थिक मदत करीत आहे. रामपूरमधील एका गावात दोन हिंदू मुलांची जबरदस्ती सुंता (खतना) करुन धर्मांतर करण्यामध्ये एक मौलानाचा हात असल्याचे समोर आले आहे. ते दावा इस्लामिक सेंटर नावाची संस्था चालवत आहेत. धर्मांतर झालेल्या झालेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी प्राप्त झाली असून कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले व स्त्रिया यांचा या यादीत समावेश असल्याचे पोलिसांच्या टीमने म्हटलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply