Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आक्रीत हे घडले की.. ऐन करोना कालावधीत स्विस बँकेत भारतीयांची सेव्हिंग..!

दिल्ली : कोरोना काळात स्विस बँकेत भारतीयांनी २० हजार कोटींपेक्षाही जास्त पैसे जमा केल्याचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला होता. कोरोनाच्या संकटात गरीब भरडले जात असताना श्रीमंतांना मात्र काहीच फरक पडला नसल्याचेच याद्वारे सिद्ध झाले आहे. या स संकटाच्या घडीतही भारतीयांनी इतका पैसा या बँकेत जमा केल्याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. मात्र, भारत सरकारने हा अहवालच नाकारला आहे. हा अहवाल चुकीचा आहे. त्यामुळे सत्यता पडताळण्यासाठी स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांकडे आधिक माहिती मागितली आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, गुरुवारी बँकेनेच याबाबत माहिती दिल होती. त्यानुसार सन २०२० मध्ये भारतीय नागरिक आणि भारतीय संस्थांनी स्विस बँकेत ठेवलेल्या रकमेत वाढ झाली आहे. आता ही रक्कम २० हजार ७०० कोटींपेक्षा जास्त आहे, असे सांगण्यात आले. मागील १३ वर्षातील ही सर्वाधिक रक्कम आहे. सन २०१९ मध्ये भारतीयांनी ८९.९ कोटी फ्रँक्स (६,६२५ कोटी रुपये) स्विस बँकेत जमा केले होते. २०२० अखेरीस ही रक्कम २०,७०६ कोटी रुपये इतकी झाली आहे. या बँकेत जमा केलेले पैसे व्यक्ती, बँका आणि संस्थांनी जमा केले आहेत. ही रक्कम काळ्या पैशांची नाही. त्यात भारतीय, एनआरआय किंवा अन्य लोकांचे थर्ड कंट्री एंटीटीजच्या नावाने जमा होणाऱ्या पैशांचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

या अहवालावर आधिक स्पष्टीकरण देताना वित्त मंत्रालयाने म्हटले आहे, की सन २०१९ आणि २०२० या वर्षात दोन्ही देशांच्या रहिवाशांच्या संदर्भात आर्थिक लेखा माहितीची देवाणघेवाण केली. वित्तीय खात्याच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायदेशीर व्यवस्थेकडे पाहता स्विस बँकांतील ठेवींमध्ये कोणतीही वाढ होण्याची क्षमता असल्याचे दिसत नाही. दरम्यान, या मुद्द्यावर देशात राजकारण सुरू झाले आहे. शुक्रवारी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. या अहवालाबाबत सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली होती. सरकारने श्वेतपत्रिका काढून जनतेला सांगावे, की हा पैसा नेमका कुणाचा आहे, असा सवाल काँग्रेसने केला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply