Take a fresh look at your lifestyle.

साईसंस्थानाच्या मदतीने कॉंग्रेसचा शिर्डी लोकसभेवरही डोळा; पहा कोणासाठी आग्रही आहेत काँग्रेस-राष्ट्रवादीवाले

अहमदनगर : देशातील एक प्रमुख महत्वाचे आणि आर्थिकदृष्ट्याही प्रभावी असलेल्या शिर्डी संस्थानावरील अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळावर वर्णी लावण्यासाठी सध्या जोरदार रस्सीखेच आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षांनी यासाठी फिल्डिंग लावली आहे. काँग्रेस पक्षाने तर संस्थानासह शिडी लोकसभा मतदारसंघावर डोळा ठेऊन नियोजन सुरू केलेले आहे.

Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती दि. २२ जूनपर्यंत करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे या मंडळावर जाऊन आपली छाप सोडण्यासाठी अनेकांनी बड्या राजकीय नेत्यांच्या उंबऱ्यांना झिजवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी शिर्डीच्या विकासाला गती देण्यासाठी संस्थानच्या नियमावलीत बदल करून किमान ५० टक्के विश्वस्त शिर्डीतीलच ठेवण्याची मागणी जोर धरून आहे.

Advertisement

त्यामुळे याच्या दबावात राज्य सरकार विश्वस्त मंडळाची नेमणूक करणार की पुन्हा कोरोनाचे कारण सांगून वेळ मागितली जाणार याकडे शिर्डीकरांसह साई भक्तांची नजर आहे. श्रीमंतीत क्रमांक दोनचे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले साईबाबा संस्थान दाेन वर्षापासून विश्वस्त मंडळाच्या प्रतीक्षेत आहे. संस्थानचा कारभार उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली प्रशासकीय समितीकडे असून साईंची झोळी भरलेली असली तरी पायाभूत सुविधांची व विकासाची वानवा असल्याने शिर्डी शहरातील नागरिक आणि साईभक्त त्रस्त आहेत.

Advertisement

अशावेळी संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असून त्यावर तोडगा निघाला तरच पुढचा मार्ग निर्धोक होणार आहे. काँग्रेसकडून अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुनगेकर यांच्या नावाची चर्चा असून शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने मुणगेकर यांच्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून प्रस्ताव आल्याचे म्हटले जात आहे. तर, राष्ट्रवादीकडून निवृत्त प्रशासकीय अधिकारी संभाजीराव झेंडे आणि प्रभाकर देशमुख यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply