Take a fresh look at your lifestyle.

अयं.. ते सगळं जाऊ द्या की.. मोदी सरकारनेच आणलेत की अच्छे दिन; पहा कोणाची झालीय चांदी..!

मुंबई : २०१४ च्या निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने अच्छे दिन नावाचा चुनावी जुमला वापरला होता. विकासाच्या मार्गावर असलेल्या भारतीयांना यामुळे आपल्यासह देशाच्या विकासाला बुस्टर डोस मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र, आता सात वर्षांनी ही चुनावी जुमला चेष्टेचा भाग बनला आहे. मात्र, हा फ़क़्त चेष्टेचा विषय न राहता केंद्र सरकारला अच्छे दिन खऱ्या अर्थाने आल्याचाही फील येत आहे.

Advertisement

होय, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत असल्याने कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या जोरात आहे. कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नसून मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा पार झाल्यावर डिझेलसुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत असताना मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केल्याची माहिती मिळाली आहे. एकूणच मोदी सरकारच्या कृपेने कंपन्या आणि एकूण केद्र सरकारची चांदी झाली आहे.

Advertisement

याआधी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून सरकारला ४.२३ लाख कोटी रुपये मिळाले होते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल ५.२५ लाख कोटी रुपये सरकारने कमावले आहेत. याच वेळी प्राप्तिकरातून मात्र सरकारला ४.६९  लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट करातून ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजेच एकूण करामध्ये आता इंधन कराने मोदी सरकारला अच्छे दिन आणले आहेत. देशात आज इंधनाचे दर प्रचंड वाढले आहेत. दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत.

Advertisement

पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही. आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती कमी करण्याचा कोणताच विचार सरकारने केलेला नाही. उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे. यावेळी पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल आणि डिझेलवरील करांतून मिळाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. तसेच या काळात केंद्र सरकार अनेक जन कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांसाठी सुद्धा मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सध्या इंधनाच्या दर कमी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply