Take a fresh look at your lifestyle.

पेट्रोल-डिझेलवरील करातून मोदी सरकारची छप्परतोड कमाई, पाहा वर्षभरात किती कमावलं..?

नवी दिल्ली : पेट्रोल- डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले असताना, याच काळात मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करांतुन छप्परफाड कमाई केल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे उद्योग-धंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींची पगार कपात झाली. अनेकांचं उत्पन्न घटलं असतानाही लोकांना दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारनं इंधनावरील कर कायम ठेवले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असली, तरी मोदी सरकारची मोठी कमाई झाली.

Advertisement

सध्या इंधनावर लागू असलेल्या करांमधून मोदी सरकार बक्कळ कमाई करत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल, डिझेलवरील करांतून मिळालं आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारनं पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून तब्बल ५.२५ लाख कोटी रुपयांची कमाई केली. याच कालावधीत प्राप्तिकराच्या माध्यमातून सरकारला ४.६९ लाख कोटी रुपये मिळाले. कंपन्यांनी भरलेल्या कॉर्पोरेट करांतून सरकारला ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले.

Advertisement

सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर प्रचंड कर आकारला जातो. उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर यांच्यासह आणखी अर्धा डझन लहान करांचा, शुल्कांचा आणि सेसचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारला ५.२५ लाख कोटी रुपये मिळाले.

Advertisement

केंद्र सरकारकडून घेतला जाणारा अबकारी कर आणि राज्यांचं मूल्यवर्धित कराचा त्यात समावेश आहे. मूल्यवर्धित करांचा आकडा केवळ डिसेंबरपर्यंतचा आहे. मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून मार्च तिमाहीत राज्यांना मिळालेल्या उत्पन्नाचा यात समावेश नाही.

Advertisement

प्राप्तिकराच्या रुपात याच कालावधीत सरकारच्या तिजोरीत ४.६९ लाख कोटी रुपये जमा झाले. कॉर्पोरेट करांच्या माध्यमातून ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले.

Advertisement

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून सरकारला ४.२३ लाख रुपये मिळाले होते. आता यात तब्बल १ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारला इंधनावरील करांमधून सरकारला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply