Take a fresh look at your lifestyle.

आताच घ्या कार..! ‘मारुती सुझुकी’ने घेतलाय मोठा निर्णय, त्याचा ग्राहकांना बसणार फटका..!

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी कोरोना नियम शिथिल करण्यास सुरवात केली आहे. अनलॉक सुरू झाल्याने ऑटोमोबाइल कंपन्यांनी प्रॉडक्शन वाढविणे सुरू केले आहे. परिस्थिती काहीशी पूर्वपदावर येत असली, तरी येत्या दोन महिन्यात पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

दरम्यान, एकीकडे अशी परिस्थिती असताना, देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनीने जुलैपासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीतील वाढ ही कारच्या वेगवेगळ्या मॉडेलसाठी असेल. गेल्या वर्षभरात कंपनीच्या वाहनांची किंमत वाढली आहे. त्यामुळे काही अतिरिक्त भार ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Advertisement

‘मारुती’ने दूसऱ्या क्वार्टरमध्ये कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ कारच्या वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार केली जाणार आहे. याआधीही ‘मारुती’ने एप्रिलमध्ये कारच्या किमतीत वाढ केली होती. इनपूट कॉस्ट (Input cost) वाढल्याने कारच्या किमतीत 34 हजार रुपयांपर्यंत वाढ केल्याचे त्यावेळी कंपनीने म्हटले होते.

Advertisement

दरम्यान, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांच्या ‘एक्सपोर्ट’वरही परिणाम झाला. आता ‘मारुती सुझुकी’च्या प्लांट्समध्ये प्रॉडक्शन सुरू झालं असून, त्यासाठी ‘सेफ्टी प्रोटोकॉल’ लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आले त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. देशातील दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारांनी हळुहळू निर्बंध हटवले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply