Take a fresh look at your lifestyle.

केंद्रातील भाजपचा आहे ‘तो’ डाव; पहा नेमकी काय टीका केलीय राष्ट्रवादीने

कोल्हापूर : आधी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेने राज्यातील राजकारणात उठलेले वादळ थांबत नाही तोच आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने नवा राजकीय वाद सुरू केला आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारमध्ये पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधक या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत. आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

मुश्रीफ म्हणाले, की ‘आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा वापर करून भाजप राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. हे सरकार पाच नाही तर 35 वर्षे कायम राहील. आम्ही शिवसेनेस मोठ्या मनाने सांभाळत आहोत, त्यामुळे त्यांना कमजोर करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरून सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. तर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यास प्रत्युत्तर देत आहेत. मुश्रीफ पुढे म्हणाले, की मागील काही महिन्यांपासून भाजपने सरनाईक यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना असे पत्र पाठवले असून राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. हे आरोप निराधार आहेत. कारण, ज्यावेळी तिन्ही पक्षांचे सरकार राज्यात आले त्यावेळी सेनेचे कार्यकर्ते किंवा नेते फोडायचे नाहीत असा नियम केला होता, त्यामुळे सेनेचे नुकसान कसे करू, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Advertisement

यानंतर त्यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. हे सरकार पाच नाही तर 35 वर्षे टिकेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सत्ता नसल्याने सध्या अस्वस्थ आहेत. सत्ता मिळवण्यासाठीच धडपड सुरू आहे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

Advertisement

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी घटक पक्षांत मतभेद होताना दिसत आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर सेना आणि  राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी घटक पक्षांनी काहीशा विरोधी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी मात्र यास पाठिंबाच दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये अस्वस्थाता वाढली आहे. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रानेही राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply