Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा झळाळी, भारतीय सराफ बाजारातील आजचा भाव जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात चढ उतार सुरू आहेत. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) सोन्याचे दराने उसळी घेतली.

Advertisement

‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर (MCX) आज सोन्याचा दर 0.40 टक्क्यांनी वाढला, तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. MCX वर चांदीचा दर 0.16 टक्क्यांनी घसरला. मागील आठवडयामध्ये गुरूवारी, शुक्रवारी सोन्याचा दर अंदाजे 1600 रूपयांनी कमी झाला होता. दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दरात 2500 रूपयांची घट झाली होती.

Advertisement

आंतरराष्ट्रीय घडामोडीचा भारतात सोन्याच्या दरावर परिणाम होतो. मागील महिन्यात काही प्रमाणात सोन्यातील गुंतवणूक कमी झाल्याचं दिसलं होतं. सोन्याच्या ‘इटीएस’मध्ये 57 टक्क्यांनी गुंतवणूक कमी झाल्याचे दिसत आहे.

Advertisement

सोन्याचा आजचा भाव 4702 प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 4542 प्रति ग्रॅम आहेत. चांदीचा दर प्रतिकिलो 67,635 रूपये इतका आहे.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असणे अनिवार्य आहे. नियमानुसार 14,18,22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असला, तरत ते दागिने विकता येणार आहेत. सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क नसल्यास सराफ व्यापाऱ्याला दागिन्यांच्या किमतीच्या पाचपटीने दण्ड आकारण्यात येईल तसेच एक वर्षाचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply