Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईच्या गोंधळास मोदी सरकार जबाबदार; पहा नेमकी काय टीका केलीय ‘आप’ल्यांनी

दिल्ली : आज जगातील अन्य देशांचा विचार केला तर भारतात लसींचे संकट निर्माण झाले आहे. बहुतांश देशांनी लसीकरणाचे योग्य नियोजन केले. स्वतःच्या देशात लसी तर तयार केल्याच पण आवश्यकता वाटल्यास अन्य देशांतून सुद्धा लसी खरेदी केल्या. कोरोनास रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे लक्षात आल्याने आपल्या देशातील लोकांचे वेगाने लसीकरण केले. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की बऱ्याच देशांनी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पण भारतात मात्र अगदी याउलट परिस्थिती आहे. येथे अजूनही लसींची टंचाई आहे, अशी टीका दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.

Advertisement

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला टार्गेट केले आहे. देशात लसीकरणाचा जो काही गोंधळ सुरू आहे, त्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप तर विरोधी पक्ष आधीपासूनच करत आहेत. आता आपने मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर सुद्धा केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे.

Advertisement

‘मोफत लसीकरणाबाबत सुद्धा सरकारने जाहिरातबाजी केली आहे. कारण, देशातील काही राज्यांना जून महिन्यातील लसींचा साठा अजूनही मिळालेला नाही. आणि आता तर जुलै महिन्यात फक्त 15 लाख लसींचे डोस मिळणार असल्याचे सांगितले जात आहे, इतक्या कमी लसी मिळणार असतील तर लसीकरण कसे होणार ?,’ असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Advertisement

‘केंद्र सरकारची जाहिरातबाजी देशाला नकोय तर कोरोना  प्रतिबंधक लसी हव्या आहेत. देशात कोरोना लसी नाहीत मात्र जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जाहिरातबाजीवर जितका खर्च केला तो पैसा जर लस निर्मिती करण्यास दिला असता तर सर्वांना लसींचे डोस मिळाले असते,’ असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारकडून दबाव आणला जात, असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply