Take a fresh look at your lifestyle.

काश्मीरला आहे ‘त्याची’ गरज; पहा नेमके काय म्हटलेय काँग्रेस नेत्याने

दिल्ली : काश्मीरच्या मुद्द्यावर देशातील राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. आधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काश्मीरबाबत एक मागणी केली आहे. जम्मू- काश्मीरच्या नेत्यांबरोबर होणाऱ्या बैठकीआधी काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

ते पुढे म्हणाले, की जम्मू-काश्मीर राज्यास पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, असे काँग्रेस पक्षाचे म्हणणे आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात वादग्रस्त कायदे रद्द करून या राज्यात पूर्वी जी होती ती परिस्थिती कायम केली पाहिजे. जम्मू-काश्मीर एक राज्य होते, त्यानंतर विलयाच्या कागदपत्रांवर सही केल्यानंतर या राज्याचा भारतात समावेश करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, येत्या 24 जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, या बैठकीस जम्मू-काश्मीरच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही बैठक होण्याआधीच काँग्रेसने काश्मीरबाबत असे विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. आता यावर सत्ताधारी भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

याआधी दिग्विजय सिंह यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ उडाला होता. ते म्हणाले होते, की केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा विचार केला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र राजकारणात वादळ उठले होते. भाजपने यातील राजकारण ओळखत काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्री सुद्धा काँग्रेसवर आरोपांचा भडिमार करत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, की आज अवघा देश काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 बहाल करण्याच्या विरोधात आहे. दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य मात्र भारतास काँग्रेस मुक्त करण्यासारखेच आहे. आता तर केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल याची कोणतीच शक्यता दिसत नाही. आणि कदाचित काँग्रेसचे सरकार आले तरी सुद्धा काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 बहाल करणे शक्यच होणार नाही.

Advertisement

या प्रकरणी राजकारणात वादळ उठले आहे. भाजप नेते पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेसवर आरोप करत आहेत. कोरोना काळातील अपयश, कोलमडलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर अडचणीत सापडलेल्या भाजपला या मुद्द्याने संधी मिळाली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते काँग्रेसवर आरोप करत आहेत. या प्रकरणावर आता काँग्रेस नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply