Take a fresh look at your lifestyle.

छोट्या उद्योगांना कर्ज देण्यात ‘ही’ बँक आघाडीवर, पहा किती रुपयांची कर्जे दिली आहेत..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे किरकोळ व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अडचणीत आले. संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी या उद्योगांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. अशा वेळी पुण्यातील एक बँक या उद्योगांच्या मदतीला धावून आली आहे. या बँकेचे नाव आहे, बँक ऑफ महाराष्ट्र..!

Advertisement

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने किरकोळ व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना माेठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केला आहे. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये कर्जवाढीबाबत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने (Bank of Maharashtra) अव्वल स्थान मिळवले आहे. या बँकेनं ‘एमएसएमई’ कर्जात 35 टक्क्यांची वाढ नोंदवलीय. बँकेने ‘एमएसएमई’ क्षेत्रातील युनिटसाठी 2020-21 मध्ये 23,133 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत.

Advertisement

दुसऱ्या क्रमांकावर आहे, चेन्नईची ‘इंडियन बँक’. ‘एमएसएमई’ क्षेत्राला या बँकेने 15.22 टक्के वाढीसह एकूण 70,180 कोटी रुपयांचे कर्ज दिलं. किरकोळ क्षेत्रातील कर्जाबाबत ‘बीओएम’मध्ये सुमारे 25.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली, जी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा जास्त आहे. ‘एसबीआय’ने या विभागात 16.47 टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.

Advertisement

किरकोळ क्षेत्राला दिलेल्या एकूण कर्जात ‘एसबीआय’ने रकमेच्या बाबतीत ‘बँक ऑफ महाराष्ट्र’पेक्षा 30 पट अधिक कर्ज दिलं आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने या विभागात एकूण 28,651 कोटी रुपये, तर ‘एसबीआय’ने 8.70 लाख कोटींचे कर्ज दिले आहे.

Advertisement

2020-21 मध्ये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा एकल निव्वळ नफा 42 टक्क्यांनी वाढून 550.25 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षात 388.58 कोटी रुपये होता.

Advertisement

दरम्यान, मागील आर्थिक वर्षात ‘बँक ऑफ बडोदा’ने किरकोळ क्षेत्राला दिलेल्या कर्जामध्ये 14.35 टक्के वाढ झाली असून, त्यात एकूण 1.20 लाख कोटींचे कर्ज देण्यात आले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.