Take a fresh look at your lifestyle.

स्वरचित चक्रव्युहात अडकला चीन; पहा कुठे आणि कसा बसलाय मोठा झटका..!

दिल्ली : ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ प्रकल्पात चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, पाकिस्तानात काही महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम बंद पडल्याच्या बातम्या आहेत. या प्रकल्पास देशतील विरोधी पक्षांचा विरोध आहे. तसेच अन्य काही कारणांमुळे इम्रान सरकारला या प्रकल्पाचे काम सुरू करणे कठीण झाले आहे. यामुळे चीन मात्र चांगलाच अस्वस्थ झाला आहे. एकतर या प्रकल्पासाठी चीनने अब्जावधी डॉलर गुंतवले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानला कोट्यावधींचे कर्ज सुद्धा दिले आहे. अशा परिस्थितीत जर प्रकल्पातील योजनांचे कामकाज सुरू होत नसेल तर अडचणी वाढणार आहेत. या प्रकल्पातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत तर चीनने स्पष्टच सांगितले आहे, की यासाठी ९ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाणार नाही.

Advertisement

जगात आपला दबदबा निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यामुळेच शेजारी देशांना विनाकारण त्रास देणे, त्यांना कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचे प्रकार चीन करत आहे. या प्रयत्नात चीनला यशही मिळत आहे. मात्र, काही वेळेस जोरदार झटका बसत आहे. असाच प्रकार आता समोर आला आहे. दुसऱ्या देशांना फसवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चीनला पाकिस्तानात मात्र जोरदार झटका बसत आहे. असे असले तरी या प्रकल्पात चीनचे आधीच अब्जावधी रुपये अडकले आहेत. तसेच या प्रकल्पाच्या अटी आणि शर्ती सुद्धा गोपनीय आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी चीनने आतापर्यंत किती पैसे खर्च केले आहेत आणि पाकिस्तानला किती व्याजदराने कर्ज दिले आहे, याची काहीच माहिती मिळत नाही.

Advertisement

आता मात्र या प्रकल्पातील अडचणी कमी करण्यासाठी चीनने विरोधी पक्षांकडे मदत मागितली आहे. एप्रिल महिन्यात चिनी राजदूताने विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत या मुद्द्यावर चर्चा केली होती. पाकिस्तान सरकारकडून कार्यवाही होत नसल्याने चीनने आता आपल्या पद्धतीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकल्पासंदर्भात एक विधेयक पाकिस्तानच्या संसदेत पास करण्यात आले होते. विरोधी पक्षांनी मात्र यास कडाडून विरोध केला होता. विरोधकांचे असे म्हणणे होते की या प्रकरणी सर्व दस्तऐवज संसदेच्या माध्यमातून देशासमोर ठेवावेत. मात्र, सरकार यास तयार नाही. या प्रकल्पाचा देशास काहीच फायदा होणार नाही, चीन मात्र करोडो रुपये कमाई करेल, असा आरोप विरोधकांनी केला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे प्रकल्पाचे कामकाज रखडले आहे, आणि चीनची डोकेदुखी सुद्धा वाढली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply