Take a fresh look at your lifestyle.

किम जोंग यांच्या उत्तर कोरियामध्ये आलेय ‘हे’ भीषण संकट; हुकुमशहानेही दिलीय कबुली

दिल्ली : हुकुमशहा किम याने संभाव्य संकटाचा इशारा दिला होता. तसेच याबाबत नियोजनड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अधिकाऱ्यांना आरडूअस मार्च साठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. आरडूअस मार्च चा उपयोग उत्तर कोरियात १९९४ ते १९९८ दरम्यान खाद्य संकटावेळी केला गेला होता. आताही देशात पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नैसर्गिक संकटामुळे देशातील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे हा देश आज अन्नधान्याच्या दुष्काळाचा सामना करत आहे. याआधीही देशात असे संकट आले होते. या संकटात कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला होता, असा अंदाज आहे. त्यानंतर आता पुन्हा दुष्काळाचे संकट देश अनुभवतो आहे.

Advertisement

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी अखेर मान्य केले आहे, की देशात खाद्यपदार्थांचे भीषण संकट निर्माण झाले आहे. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की काळ्या चहाच्या एका छोट्या पाकिटासाठी तब्बल ५ हजार १६७ रुपये मोजावे लागत आहेत. कॉफी पॅकसाठी ७ हजार ३८१ रुपये द्यावे लागत आहेत. सीएनएनच्या अहवालानुसार बैठकीत किम यांनी देशातील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

देशात आजमितीस साडेआठ लाख टन धान्याची कमतरता आहे. फक्त दोन महिनेच पुरेल इतका धान्यसाठा सध्या उपलब्ध आहे. कोरोनाा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाच्या सीमा सध्या बंद आहेत. आणि निर्बंध कठोरच राहणार असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मात्र लोकांची उपासमार होत आहे. या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहे. सध्या चीनकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून रहावे लागत आहे. देशातील आण्विक कार्यक्रमांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध या देशावर आहेत. देशात अन्न धान्याचे उत्पादन सुद्धा जास्त होत नाही. त्यामुळे दुसऱ्या देशांच्या मदतीवरच अवलंबून राहणे भाग पडले आहे. आणि आता तर कोरोनाच्या काळात अडचणी जास्तच वाढल्या आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे, की आज देशात महागाईने सगळेच रेकॉर्ड मोडले आहे. चहा, कॉफी, फळे आणि अन्न धान्याच्या किमती हजारो रुपयांनी वाढल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply