Take a fresh look at your lifestyle.

तिसऱ्या लाटेबद्दल आलाय ‘असा’ गंभीर इशारा; पहा केंद्र सरकारची कितपत तयारी आहे ते..!

दिल्ली : देशात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ‘रॉयटर्स’ या वृत्त संस्थेने नुकताच एक सर्वे केला होता, यामध्ये आरोग्य तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे, की दुसऱ्या लाटेच्या तुलनेत देश तिसऱ्या लाटेचा मुकाबला अधिक सक्षमतेने करेल. जून महिन्यात हा सर्वे केला होता. यामध्ये काही जणांनी तिसरी लाट ऑक्टोबर मध्ये येईल असे म्हटले आहे. तर काही जणांनी ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येईल असे सांगितले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान देशात तिसरी लाट येईल, असेही काही तज्ज्ञांनी सांगितले.

Advertisement

देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.
केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले, की देशात तिसरी लाट आली तरी आपण आता तयार आहोत. देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास तयार आहे. असे असले तरी लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे सुद्धा आवश्यक असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने नियोजन करण्यास सुरुवात केली. देशातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. ऑक्सिजन कमतरता दूर करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले. नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतील याचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे आता तिसरी लाट आली तरी या लाटेचा सामना करण्यास तयार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.