Take a fresh look at your lifestyle.

म्हणून योगींची सत्ता जाणार आणि UP मध्ये सत्तांतर नक्कीच होणार; यादवांना विश्वास..!

लखनऊ : उत्तरप्रदेश राज्यात पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आताच तयारी जोमात आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनिती बनवण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पार्टीने विविध मुद्द्यांवर योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. एकूणच या राज्यात सत्तांतर होणार असाच विश्वास अखिलेश यादव यांनी केला आहे.

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव होणार आहे, असा दावा पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. राज्यातील जनमत भाजपच्या विरोधात जात आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या कारभारावर टीका करताना यादव म्हणाले, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. मागील संकल्पपत्रात भाजपने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण का केली नाहीत, याचे उत्तर जनतेला हवे आहे. वाढत जाणाऱ्या महागाईवर सुद्धा भाजपला उत्तर द्यावे लागणार आहे, बेरोजगार, शिक्षित

Advertisement

युवक, नोकरदार, शेतकरी यांच्यासाठी सरकारने काय केले, असा सवाल यादव यांनी उपस्थित केला. राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीत जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आहेत, मागील पन्नास वर्षांच्या काळात असे कधीच घडले नव्हते. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम या सरकारने केले आहे, या सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे, अशा शब्दांत यादव यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

Advertisement

दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षात निवडणुका असल्याने भाजपने तयारीस सुरुवात केली आहे. पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहे. संघाचे पदाधिकारी सुद्धा दौरे करत आहेत. त्यामुळे या राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यावेळी भाजप योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यादृष्टीनेच या राज्यात नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसची स्थिती मात्र आधिकच खराब होत आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.