Take a fresh look at your lifestyle.

कोरोनावरील उपचारात खिसा साफ..! नो टेन्शन, ‘ही’ बँक देतेय औषध-उपचारासाठी पैसे..!

नवी दिल्ली : कोरोनावरील उपचार घेताना दवाखान्याची लाखो रुपयांची बिले पाहून अनेकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. ज्यांचा आरोग्य विमा नाही, त्यांचे तर विचारुच नका. त्यांचा खिसाच साफ झाला. अनेकांचे आर्थिक गणित बिघडले. काहींनी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवले, तर काहींनी बँकेचे..!

Advertisement

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) धावून आली आहे. म्हणजे या बँकेनं अशा लोकांसाठी विशेष कर्जयोजना जाहीर केली आहे. तिचे नाव आहे, ‘कवच पर्सनल लोन’. या योजनेतंर्गत कोणालाही 25 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

Advertisement

या योजनेत कमी व्याजदरात (वार्षिक 8.5 टक्के) कर्ज मिळणार आहे. कर्जफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. मात्र, तुम्हाला ते मुदतीपूर्वी फेडायचे असेल, तर त्यासाठी कोणताही दंड लागणार नाही. तसेच कर्जदारांना तीन महिन्यांच्या मोरेटोरियमची (moratorium) सुविधाही देण्यात आली आहे.

Advertisement

कर्जासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी नाही. ‘फोर क्लोझर’ आणि ‘प्री पेमेंट’वरही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

Advertisement

कोणाला मिळू शकते कर्ज..?
स्टेट बँकेचे पेन्शनधारक, नोकरी-व्यवसाय करणारी कोणतीही व्यक्ती हे कर्ज घेऊ शकते. 1 एप्रिल 2021 नंतर तुम्हाला किंवा कुटंबातील कोणालाही कोरोनाची बाधा झाली असेल, तर या योजनेसाठी पात्र आहात. मात्र, कर्ज घेण्यासाठी कोरोना रिपोर्ट दाखवणे बंधनकारक आहे.

Advertisement

कसे मिळणार कर्ज..?
एसबीआयचे ‘कवच पर्सनल लोन’ घेण्यासाठी बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. एसबीआयच्या ‘योनो अ‍ॅप’द्वारेही कर्जासाठी अर्ज करता येईल. कर्जाची रक्कम कर्जदाराच्या पगार वा बचत खात्यामध्ये जमा केली जाईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply

You cannot print contents of this website.