Take a fresh look at your lifestyle.

तरच इंधन दरवाढीतून दिलासा शक्य; पहा नेमके काय म्हटलेय मंत्री गडकरींनी

दिल्ली : देशात इंधनाच्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः हैराण केले आहे. काही केल्या इंधनाचे दर कमी होत नाहीत. कोरोनाच्या संकटातही पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत. मनमानी पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करत आहेत. काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने काही शहरात पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे. डिझेलही त्याच दिशेने वाटचाल करत आहे.

Advertisement

इंधन दरवाढीची जाणीव सरकारला नाही असे आजिबात नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सरकार दर कमी करण्याचा निर्णय घेत नाही. कोरोना काळात सरकारचे उत्पन्न घटले आहे. आरोग्यावरील खर्च वाढला आहे. जनकल्याणाच्या योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठीही कोट्यावधी रुपये खर्च येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारलाच पैशांची चणचण जाणवत असल्याने इंधनाचे दर कमी करण्याचा विचार नसल्याचे केंद्रीय मंत्रीच सांगत आहेत. सध्याच्या परिस्थितीत दर कमी होणे गरजेचेच आहे. मात्र, सरकार तसा निर्णय घेण्याच्या विचारात नाही. मग, दर कमी होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंधनाचे दर कमी होतील की नाही हे आताच सांगता येत नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक उपाय मात्र सांगितला आहे. हा उपाय जर अमलात आणला गेला तर इंधनाचे दर निश्चित कमी होतील अशी शक्यता आहे. गडकरी यांनी याआधीही हा उपाय सांगितला होता, आज पुन्हा त्यांनी हाच एक उपाय असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीस आता इथेनॉल हाच एकमेव पर्याय असल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशात इंधनाच्या किमती खूपच वाढल्या आहेत. या किमती कमी करुन नागरिकांना दिलासा देणेही आवश्यक आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्राझील यांसारख्या देशात वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मिश्र इंधनाचा पर्याय असणाऱ्या वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. या वाहनांंमध्ये १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो इथेनॉलचा पर्याय देण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. सन २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत नेणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यामुळे इंधनाचे दर कमी होतील, असे सांगण्यात आले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply