Take a fresh look at your lifestyle.

परिस्थिती पूर्वपदावर येतेय.. मात्र, ‘तो’ धोका कायम असल्याने संभ्रम

मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता पुन्हा एकदा पोटापाण्याची सोय लावण्यासाठी मजूर शहराकडे रवाना होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सगळीकडे संभ्रम आहे. देशात दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी केले आहेत. राज्ये अनलॉक होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दैनंदिन व्यवहार सुरू होत आहेत. खासगी कंपन्या, उद्योग, कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात आपल्या गावी गेलेले कामगार, मजुरांनी पुन्हा शहरांचा रस्ता धरला आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातील कामगार शहरांकडे निघाले आहेत. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सात दिवसांच्या काळात या चार राज्यांतील जवळपास 32.56 लाख प्रवासी वाहतुक केली आहे. यामध्ये प्रवासी कामगारांची संख्या जास्त होती. 11 ते 17 जून या काळात देशातील विविध राज्यांतील प्रवाशांना दिल्ली, मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, चेन्नई या शहरात सोडले. कामगारांना शहरात पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वे मेल, एक्स्प्रेस, हॉलिडे आणि समर या विशेष रेल्वेचे नियोजन करत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका पाहता कोविड प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जात असल्याचे रेल्वेने सांगितले.

Advertisement

या विशेष रेल्वे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांतून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि बंगळुरू या शहरांदरम्यान चालवण्यात येत आहेत. पुढील दहा दिवसांत आणखी 29 लाख प्रवाशांनी औद्योगिक महानगरात जाण्यासाठी रेल्वे बुकिंग केले आहे. यामध्ये प्रवासी कामगार सुद्धा आहेत. दरम्यान, देशात दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. रुग्णवाढीचा वेग इतका जबरदस्त होता की एक दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली. ऑक्सिजनचे मोठे संकट निर्माण झाले. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. या काळात मृत्युदर सुद्धा वाढला होता, पॉझिटिव्हिटी रेट वाढला होता, अशी विदारक परिस्थिती या काळात होती. लॉकडाऊन असल्याने कंपन्या, कारखाने बंद होते, त्यामुळे कामगार आणि मजूर आपल्या गावाकडे गेले होते. आता मात्र परिस्थिती सुधारत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध कमी केल्याने औद्योगिक महानगरांतील कंपन्या कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत, त्यामुळे कामगार पुन्हा या शहरात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply