Take a fresh look at your lifestyle.

एकदमच वाईट चाललंय की.. बनावट लसीकरण जोमात, अवघी आरोग्य यंत्रणाच कोमात..!

मुंबई : करोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यावर आणि त्यात हजारो भारतीयांना जीव गमवावा लागल्यानंतरही भारतातील आरोग्याची विदारक परिस्थिती कायम आहे. नव्हे, उलट दिवसेंदिवस त्यातील त्रुटी आणि घोटाळे उघडकीस येण्याला सुरुवात झालेली आहे. कुंभमेळ्यातील करोना चाचणी घोटाळ्याने अवघे जग हादरले असतानाच आता महाराष्ट्रात लसघोटाळे उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. बनावट लस देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचे रॅकेट सक्रीय झालेले आहे . कारण, केंद्र सरकारकडून लसटंचाईची मात्रा अवघ्या देशाला मिळाली आहे.

Advertisement

मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांत शिबिरे घेऊन बनावट कोरोना लसीकरण केल्याच्या खळबळजनक घटना उघडकीस येत आहेत. खासगी रुग्णालयांच्या नावाने वेगवेगळ्या हाउसिंग सोसायट्यांत जाऊन नऊ ठिकाणी शिबिर घेऊन सुमारे २ हजार नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलेले आहे. एकूणच ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यताही आहे.

Advertisement

कांदीवलीच्या हिरानंद हॅरिटेज रिसिडेंट वेलफेअर असोसिएशनने ३० मे रोजी एक लसीकरण शिबिर आयोजित केल्यावर शिबिरासाठी एका खासगी रुग्णालयाच्या व्यक्तीने संपर्क केला.  त्याने एका दलालाच्या माध्यमातून सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये हे शिबिर घेतले. सोसायटीने प्रतिसदस्य १२६० रुपये याप्रमाणे या ठगांना ४.५६ लाख रुपये दिले आणि लसीकरण झाले. या शिबिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचनांचे पालन न झाल्याने मग नागरिकांना याच संशय आला.

Advertisement

मुंबईतील एका प्रॉडक्शन हाऊसमध्येही सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लस देण्यासाठी बनावट लसीकरण शिबीर घेण्यात आलेले आहे. लसीकरणानंतर कोणालाही ताप आला नाही की कुणाचा हात दुखल्याचे लक्षण न दिसल्याने मग लसवंत झालेल्या सर्वांना याबाबत संशय आल्याने हा भांडाफोड झाला आहे. लोकांना नानावटी, लाईफलाइन, नेस्की आणि बीएमसी अशा वेगवेगळ्या रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र मिळाल्याने संशय आणखी वाढून त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी या शिबिराचे आयोजन करणाऱ्या चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply