Take a fresh look at your lifestyle.

करोनामुळे ‘ही’ डोकेदुखीही वाढलीय की; पहा तज्ञांनी नेमका काय दिलास इशारा

दिल्ली : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलेल्या माहिती नुसार सन २०२० मधील पहिल्या चार महिन्यांच्या काळात कोविड बायो मेडिकल वेस्ट प्रत्येक महिन्यास साधारण २४० टन जमा होत होते. मात्र, या वर्षात हा आकडा ६३० टन इतका झाला आहे. म्हणजेच या कचऱ्यात तीनपट वाढ झाली आहे. मागील वर्षात एप्रिल पर्यंत एक दिवसात साधारण दीड हजार कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र यावेळेस दुसऱ्या लाटेत २८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. या लाटेत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त होते. त्यामुळे साहजिकच कोविड कचऱ्यात वाढ झाली आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेर बायो मेडिकल वेस्टचे प्रमाण खूप वाढले आहे. मागील वर्षात एक दिवसात देशभरात ८ टन कोविड कचरा तयार होत होता यावेळी मात्र हा आकडा २४ टनांपर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या लाटेत संक्रमणाचा वेग जास्त होता त्यामुळे कोविड कचऱ्यात सुद्धा वाढ झाली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग अगदीच जबरदस्त होता. एकाच दिवसात चार लाख रुग्ण सापडत होते. दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले होते. त्यामुळे पीपीई किट, मास्कसह अन्य मेडिकल वेस्टमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तज्ञांच्या मते, या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे खूप गरजेचे आहे. असे जर केले गेले नाही तर आपणास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. याद्वारे संक्रमण फैलावण्याचा धोका आहे. तसेच पर्यावर्णाचेही नुकसान होणार आहे.

Advertisement

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राजधानी दिल्लीत दोन प्रकल्प सुरू आहेत. देशात बायो मेडिकल वेस्टच्या बाबतीत दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे बायो मेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे अधिक आवश्यक बनले आहे. कोविड कचऱ्यापासून संक्रमण फैलावण्याचा धोका असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले होते. यासाठी मंडळाने मार्गदर्शक तत्वे सुद्धा जारी केली होती. दरम्यान, या मुद्द्यावर तज्ञांनी सुद्धा इशारा दिला आहे. त्यांच्या मते हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर यापासून अन्य गंभीर आजार आणि कोरोना संक्रमण फैलावण्याचा धोका असतो. त्यामुळे हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply